Francis Sardine Dainik Gomantak
गोवा

Francis Sardine: घरी आराम करा; कुडतरीत अनामत रक्कमही जप्त होईल

चर्चिलना आता राजकारणात भवितव्य नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Francis Sardine "माजी खासदार चर्चिल आलेमाव यांना आता राजकारणात भवितव्य उरलेले नाही. त्यांनी उगीच धडपड करू नये. जे सरकार सत्तेवर असते, तेथून पैसे उकळणे एवढेच त्‍यांचे काम असते," अशी खरमरीत टीका दक्षिण गोव्‍याचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

कुडतरीत तर त्यांनी निवडणूक लढवूनच दाखवावी. त्यांची अनामत रक्कमसुद्धा जप्त होईल, असे सांगून आपण दोनदा हरलो तो चर्चिलमुळे नव्‍हे, तर त्यात आपलीच चूक होती, असा दावा सार्दिन यांनी केला.

गोव्यात परप्रांतीय मजुरांमुळे गुन्हे वाढतात, या मुख्यमंत्र्यांच्‍या वक्तव्‍यात तथ्य आहे. आपण त्यांच्याशी सहमत आहे असे सांगून सार्दिन यांनी सरकारला अनेक सूचना केल्या. त्यात नारळासाठीची तसेच इतर कृषी उत्पादनासाठीचे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावे.

त्यामुळेच गोव्यात कृषी क्षेत्राचे संवर्धन होणे शक्य आहे. तसेच बांध, शेतासाठी जलस्त्रोत खात्याकडून दिले जाणारे अनुदान वेळेवर द्यावे.

कृषी क्षेत्रातील कुठल्या कामासाठी कृषी खात्याकडून व जलस्त्रोत खात्याकडून अनुदान दिले जाते, याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी किंवा त्यांच्यामध्ये जागृती करावी आदी सूचनांचा समावेश होता.

आपण गेल्या कित्येक महिन्यांपासून रेती, घरबांधणीसाठी चिरेव्यवहार कायदेशीर करण्याची, तसेच बेकायदेशीरपणे चालवत असलेल्या रेती व चिरेखाणींवर कारवाई करावी अशी मागणी करीत आहे. तरीसुद्धा सरकार काहीच करीत नाही.

खाण खात्याने यावर उपाययोजना करावी अशी मागणी सार्दिन यांनी केली. रेतीचा प्रश्र्न संसदेत उपस्थित केला का? असे विचारले असता ते म्हणाले, हा राज्यस्तरावरील प्रश्र्न आहे व तो इथेच सोडवावा लागेल. जे प्रश्र केंद्राकडे आहेत, तेच मी संसदेत मांडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

SCROLL FOR NEXT