Churchill Brothers beat Aizawl FC by 2-0 in the Indian Super League Dainik Gomaantak
गोवा

I-League Football Tournament: चर्चिल ब्रदर्सचा ऐजॉल एफसीवर दोन गोलने दणदणीत 'विजय'

I-League Football Tournament: आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील पराभवाची परतफेड करताना चर्चिल ब्रदर्सने शुक्रवारी ऐजॉल एफसीवर 2-0 फरकाने विजय नोंदवला.

किशोर पेटकर

I-League Football Tournament: आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील पराभवाची परतफेड करताना चर्चिल ब्रदर्सने शुक्रवारी ऐजॉल एफसीवर 2-0 फरकाने विजय नोंदवला. वास्को येथील टिळक मैदानावर लढत झाली.

दरम्यान, ऐजॉल एफसीने गेल्या 28 मार्च रोजी चर्चिल ब्रदर्सवर 4-0 फरकाने दणदणीत विजय मिळवला होता, पण पाहुण्या संघाला शुक्रवारी त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. माजी आय-लीग विजेत्यांना लुईस ओगाना याने सातव्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. नंतर ऐजॉलचा बदली खेळाडू लाल्मुआनॉमा याने 90व्या मिनिटास केलेल्या शानदार गोलमुळे 90 व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.

दुसरीकडे, चर्चिल ब्रदर्सचा हा 23 सामन्यांतील आठवा विजय ठरला. 30 गुणांसह त्यांचे आठवे स्थान कायम राहिले. ऐजॉल एफसीला नववा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे 22 सामन्यानंतर त्यांचे 25 गुण आणि नवव्या क्रमांकात फरक पडला नाही. चर्चिल ब्रदर्सचा पुढचा सामना 10 एप्रिलला वास्को येथेच राजस्थान युनायटेडविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऑफिसमध्ये फक्त कामच! कामाच्या वेळी 'बर्थडे' आणि 'फेअरवेल' साजरे करण्यावर बंदी

Goa Live News: धारगळ दोन खांब ते आरोबा हॉट मिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ

"ही राजकीय नाही, गोवा वाचवण्‍याची चळवळ"! निवृत्त न्‍या. फर्दिन रिबेलोंची हाक; वाचा घोषणापत्र आणि महत्वाचे मुद्दे..

Goa Road Projects: गोव्‍यासाठी 7076 कोटींच्‍या रस्त्यांचा प्रस्‍ताव गडकरींना सादर! मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

Goa AAP:‘आप’ला गोव्यात लागलेल्या गळतीचे कारण दिल्लीतील नेतृत्व! कार्यकर्त्यांमध्ये बळावली भावना; पक्षाची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त

SCROLL FOR NEXT