Churchill Alemao Gautam Khattar Complaint Dainik Gomantak
गोवा

गोव्‍यात धार्मिक कलह माजवू पाहणाऱ्या संघटनांवर बंदी घाला! चर्चिल यांची मागणी; गौतम खट्टर विराेधात पोलिस तक्रार

Churchill Alemao Gautam Khattar Complaint: दुसऱ्या धर्मांतील पूज्‍य व्‍यक्‍तींवर आक्षेपार्ह वक्‍तव्‍य करून गोव्‍यात धार्मिक कलह माजवू पाहणाऱ्या संघटनांवर जिल्‍हा प्रशासनाने बंदी घालावी, अशी मागणी चर्चिल आलेमाव यांनी केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: दुसऱ्या धर्मांतील पूज्‍य व्‍यक्‍तींवर आक्षेपार्ह वक्‍तव्‍य करून गोव्‍यात धार्मिक कलह माजवू पाहणाऱ्या संघटनांवर जिल्‍हा प्रशासनाने बंदी घालावी, अशी मागणी बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी दक्षिण गोव्‍याच्‍या जिल्‍हाधिकारी एग्‍ना क्‍लिटस यांच्‍याकडे केली आहे.

दरम्‍यान, सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍याविरोधात आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केल्‍याबद्दल यू-ट्यूबर गौतम खट्टर विरोधात पोलिस स्‍थानकात तक्रार नोंदविली आहे. खट्टर याला त्‍वरित अटक करावी, अशी मागणी आलेमाव यांनी केली.

वार्का येथे आपली कन्‍या वालंका आलेमाव यांच्‍याबरोबर घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत आलेमाव यांनी मुरगाव येथील ‘सनातन धर्म रक्षा समिती’ या संघटनेने आयोजित केलेल्‍या परशुराम जयंतीच्‍या कार्यक्रमात खट्टर याने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्‍या विरोधात केलेल्‍या वक्‍तव्‍याचा निषेध केला.

अशा व्‍यक्‍तीवर गोव्‍यात प्रवेशबंदी लादली पाहिजे, असे मत आलेमाव यांनी व्‍यक्‍त केले. या संदर्भात आपण पोलिस तक्रार केली आहे. पोलिसांनी याेग्‍य ती कारवाई न केल्‍यास आपण न्‍यायालयात जाऊन या प्रकरणाची तडा लावू, असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गौतम खट्टरला 48 तासांत अटक करा! सासष्टीत वातावरण तप्त; आप, कॉंग्रेससह सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार

IPL Points Table: मुंबई इंडियन्सचं जबरदस्त 'कमबॅक'! गुजरातला धूळ चारुन गुणतालिकेत घेतली मोठी झेप; चेन्नईसह तीन संघांना फटका

Valpoi: वाळपईतील रस्ते, पदपथांची दुरुस्ती; 'गोवा राज्य शहरी विकास'तर्फे तीन कोटींचा निधी मंजूर

महिलांनी राजकारणात स्वत:चे स्थान स्वत:च निर्माण करावे!

पेरूच्या पोपनी केला ट्रम्पचा पोपट...!

SCROLL FOR NEXT