Manipur Violence Dainik Gomantak
गोवा

Manipur Violence: गोव्यातील चर्चने केली मणिपूरमध्ये 20 लाख रुपयांची मदत

मणिपूरमधील हिंसाचाराने वांशिक आणि धार्मिक वळण घेतले असले तरी गोव्यातील चर्चने तेथील विस्थापितांच्या मदतीसाठी 20 लाख रुपयांची मदत पाठवली.

दैनिक गोमन्तक

मणिपूरमधील हिंसाचाराने वांशिक आणि धार्मिक वळण घेतले असले तरी गोव्यातील चर्चने तेथील विस्थापितांच्या मदतीसाठी 20 लाख रुपयांची मदत पाठवली. आर्चबिशप फिलिप नेरी कार्डिनल फेर्रांव यांनी इंफाळचे मुख्य बिशप डॉमनिक लुमन यांच्याशी संपर्क साधून गोव्याच्या चर्चकडून शक्य ती सारी मदत देण्याचे आश्वासन दिले होते.

तेथून साहित्य पाठवण्यास वेळ लागणार असल्याने केवळ आर्थिक पाठबळ देण्याचा निरोप देण्यात आला त्यानंतर ही मदत देण्यात आली आहे.

याविषयी चर्चच्या सामाजिक न्याय आणि शांती केंद्राने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कॅरितास मानवतावादी मदतीद्वारे संघर्षग्रस्त लोकांशी त्यांची जात, पंथ, वंश किंवा लिंग विचारात न घेता एकजुटीने प्रवास करण्यासाठी वचनबद्ध आहे. मणिपूरमधील अभूतपूर्व मानवनिर्मित संकटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे.

नेहमीप्रमाणे कॅरितास संस्थेने मणिपूरमध्ये इंफाळमधील भागीदार संस्थांद्वारे महिला आणि किशोरवयीन मुलींच्या स्वच्छता आणि वैयक्तिक कल्याणासाठी फूड किट, शेल्टर किट आणि डिग्निटी किट तत्काळ पुरवली आहेत.

मणिपूर आणि मिझोरममध्ये वैद्यकीय शिबिरे, आरोग्य संदर्भ आणि असुरक्षित लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष अन्न किटचे वितरण याद्वारे संरक्षणविषयक समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे.

साहाय्याची चर्चची भूमिका

नाकेबंदी असूनही, मदत छावण्यांमधील हजारो अंतर्गत विस्थापित व्यक्तींना, ज्यात मैतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांचा समावेश आहे त्यांना मदत पुरवण्यात आली आहे. हिंसाचारामुळे थेट प्रभावित झालेल्या व्यक्तींना, त्यांची वांशिक पार्श्वभूमी काहीही असो, त्यांना आवश्यक साहाय्य मिळावे, अशी चर्चची भूमिका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT