Christmas Tree Competition : वास्को, ख्रिसमस सणानिमित्त वास्कोतील रवींद्र भवनात आयोजित केलेल्या आंतरशालेय ‘ख्रिसमस ट्री मेकिंग’ स्पर्धेत बायणा येथील सरकारी हायस्कूलने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. या स्पर्धेत एकूण पाच शाळांनी भाग घेतला होता.
स्पर्धेतील दुसरे बक्षीस श्री पत्तालिंगेश्वर हायस्कूल (सासमोळे-बायणा) तर तिसरे बक्षीस दीपविहार हायस्कूल (सडा) यांना प्राप्त झाले. उत्तेजनार्थ बक्षिसे सेंट जोसेफ आयसीआयएससी वास्को व देस्तेरो हायस्कूल वास्को यांना देण्यात आली.
या स्पर्धेतील विजेत्यांना कॅरल गीत गायन कार्यक्रमात बक्षिसे देण्यात आली. कॅरल गीत गायनात मुरगावच्या सहा ग्रुपनी भाग घेतला होता. प्रत्येक ग्रुपतर्फे तीन-तीन कॅरल गीते सादर केली. रवींद्र भवनच्या की-बोर्ड वर्गातील विद्यार्थ्यांनीही यावेळी तीन कॅरल गीते सादर केली.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, कार्यकारी सदस्य शांताराम पराडकर, अरविंद शिंदे, सदानंद घोणसेकर, कार्यक्रम अधिकारी बरेश नाईक आदी उपस्थित होते.
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व चषक प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण फादर मिल्ट रॉड्रिग्स व शेजर डिमेलो यांनी केले. शनाया डिसा यांनी सूत्रसंचालन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.