Christmas Celebration In Goa: गोव्यात नाताळची धून, पर्यटकांची धूम; चर्च ठरली आकर्षण

गोव्यात चर्चना आकर्षक रंगरंगोटी, रोषणाई करण्यात आली आहे.
Christmas | Immaculate Conception Church Panjim
Christmas | Immaculate Conception Church PanjimDainik Gomantak
Published on
Updated on

Christmas Celebration In Goa: राज्यभरात आज ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळाला. राज्यातील विविध चर्चमध्ये येशू जन्माचा उत्सव साजरा केला गेला. चर्चना आकर्षक रंगरंगोटी, रोषणाई करण्यात आली आहे. रात्री 12 वाजता येशू जन्माचा उत्सव साजरा करण्यात आला.

राजधानी पणजीतील इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने सामूहिक प्रार्थनेत सहभाग घेऊन एकमेकांना या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, राज्यात देशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार घडले. चर्चमध्ये प्रभू येशूच्या आगमनाचं गीतही गायलं. यानंतर चर्चच्या फादरनी सर्वांना आशीर्वाद देऊन ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या कहाणीवर आधारित देखावे तयार करण्यात आले होते. दरम्यान, भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय. विविध चर्चमध्ये येशू जन्माचा उत्सव साजरा केला जात असून चर्चना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

चैतन्य, आनंद आणि उत्साहाचं प्रतीक असलेला ख्रिसमस या सणाला ख्रिश्चन समाजात मोठं महत्त्व आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com