Fishermen Pele Video Dainik Gomantak
गोवा

Fishermen Pele: 'चर्चवरील हल्ल्याने मन व्यथित झाले'! मच्छीमार पेलेने व्यक्त केली खंत; दोषींवर कारवाईची केली मागणी

Fishermen Pele Video: देशात काही ठिकाणी चर्च तसेच ख्रिस्ती धर्मगुरू यांच्यावरील झालेल्या हल्ल्याच्या घटनांचे व्हिडिओ पाहून मन व्यथित झाले, असे पेले सांगतात.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: नाताळाच्या दिवसांत देशात काही ठिकाणी चर्च तसेच ख्रिस्ती धर्मगुरू यांच्यावरील झालेल्या हल्ल्यावरून तसेच नाताळसाठी केलेल्या सुशोभीकरणाची मोडतोड केल्याने बाणावली येथील मच्छीमार फ्रांसिस्को (पेले) फर्नांडिस हे व्यथित झाले आहेत. त्यांनी पंतप्रधान तसेच इतर नेत्यांना या घटना गंभीरपणे घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: दिल्लीतील चर्चमध्ये जाऊन आशीर्वाद घेतले. त्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद झाला. पण देशात काही ठिकाणी चर्च तसेच ख्रिस्ती धर्मगुरू यांच्यावरील झालेल्या हल्ल्याच्या घटनांचे व्हिडिओ पाहून मन व्यथित झाले, असे पेले सांगतात.

भारत हा निधर्मी देश आहे. जगात भारताला मोठे स्थान आहे व अशा घटनांमुळे देशाची जगभर बदनामी होत आहे. हे आपल्याला मुळीच पसंत नाही. गोव्यात जेव्हा समुद्र किनाऱ्यावर पर्यटक येतात तेव्हा आम्ही त्यांना कुठले किंवा त्यांचा धर्म वगैरे विचारत नाहीत, त्यांना आमच्यापैकीच एक मानून त्यांचे स्वागत केले जाते व त्यांना आवश्‍यक मदत केली जाते.

हा आमचा धर्म आहे, असेही पेले सांगतात. आमचा तिरंगा झेंडा विविधता, धैर्य, शांती, विश्र्वास यांचे प्रतीक आहे. अशा वेळी देशात अशा घटना होताना आम्हाला खरोखरच वाईट वाटते, असेही पेले सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gautam Gambhir: "आधी रणजी ट्रॉफीमध्ये मध्ये कोचिंग करा..." इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं गौतम गंभीरची उडवली खिल्ली!

Goa ZP Elections: उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; रेश्मा बांदोडकर आणि नामदेव च्यारी रिंगणात

APJ अब्दुल कलाम यांच्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी घडवला इतिहास; वाघशीर पाणबुडीतून केली सागरी सफर, पाहा Photo, Video

"माणसं पिंजऱ्यात आणि प्राणी मोकळे"! गोवा अ‍ॅनिमल लिबरेशन मूव्हमेंटचा ‘रिव्हर्स रोल-प्ले’; मांसाहाराविरुद्ध प्राणी मुक्ती मोर्चा

Dhalanche Mand: डिचोलीत फुलू लागलेत धालांचे मांड! लोकसंस्कृतीचे दर्शन; 'रंभा अवसर' प्रथेचे आकर्षण

SCROLL FOR NEXT