Chorla Ghat Truck Accident Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat Accident: ..चालकाने मारली उडी, ट्रक गेला दरीत! चोर्ला घाटात दाट धुके, दरड कोसळल्याने दुर्घटना; लाखोंचे नुकसान

Chorla Ghat Truck Accident: सकाळी ६.३० च्या दरम्यान बेळगावहून गोव्याच्या दिशेने येणारा कर्नाटकचा मालवाहू ट्रक जेव्हा कोसळलेल्या दगडीजवळ पडलेल्या झाडाला धडक बसली आणि ट्रक थेट दरीत कोसळला.

Sameer Panditrao

वाळपई: चोर्लाघाटात मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सिमेंट वाहून नेणारा ट्रक खोल दरीत कोसळला. दरड कोसळल्याने रस्त्यावरील माती, झाड व पाण्यामुळे ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने प्रसंगावधान राखून चालकाने वेळीच ट्रकमधून उडी घेतल्याने तो थोडक्यात बचावला.

चोर्लाघाटात दगडीसह रस्त्यावर झाड पडले होते, सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. सकाळी ६.३० च्या दरम्यान बेळगावहून गोव्याच्या दिशेने येणारा कर्नाटकचा मालवाहू ट्रक जेव्हा कोसळलेल्या दगडीजवळ पडलेल्या झाडाला धडक बसली आणि ट्रक थेट दरीत कोसळला.

ट्रक दरीत जातो, हे चालकाच्या लक्षात येताच त्यांनी चालत्या ट्रकमधून उडी घेतली. सदर ट्रकमध्ये असलेल्या सिमेंटच्या पिशव्यासह ट्रक खोलवर असलेल्या दरीत कोसळला.

या दुर्घटनेमुळे चोर्ला घाटात काही काळ वाहतूक कोंडी झाली. पावसामुळे घाटमाथ्यावर दाट धुके पसरले होते. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येणे कठीण झाले. सकाळी ९ च्या दरम्यान पाऊस कमी झाल्यानंतर पडलेले झाड हटविण्यात आले आणि रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला.

ट्रकमधील सिमेंट भिजले!

या अपघातात ट्रकाचे मोठे नुकसान झाले असून पावसात सिमेंटच्या पिशव्या भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. चोर्लाघाट मार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळणे, झाडे पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जेसीबी घाट रस्त्यावर ठेवली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक कोंडी दूर केली.

धुके कायम!

चोर्लाघाट मार्गावर सकाळ-संध्याकाळ दाट धुके पडत असल्यामुळे वाहने हाकणे कठीण होत आहे. या धुक्यामुळे अवघ्या चार-पाच मीटर अंतरावरील दृश्‍यसुद्धा व्यवस्थित दिसत नाही. काही वाहने दिवे न लावता हाकत आहेत, त्यामुळे अपघातांच वाढ होत आहे. संपूर्ण चोर्लाघाट ते कणकुंबीपर्यंतच्या रस्त्यांवर धुक्याची दाट चादर गेल्या महिनाभरापासून कायम आहे. कर्नाटकहद्दील नवा रस्ताही काही ठिकाणी उखडला आहे.त्यामुळे वाहने सावकाश हाकावी, वाहनांचे दिवे लावावे, अशा सूचना पोलिस खात्याने केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohan Agashe: 'गोव्याची जनता कला उपासक'! अभिनेते मोहन आगाशेंनी केले महोत्सवाचे कौतुक; ‘कृतज्ञता सन्‍मान’बद्दल मानले आभार

Goa Politics: खरी कुजबुज; नेमके चाललेय तरी काय?

Mopa Parking Fee: '..आम्ही घर कसे चालवू'? टॅक्सीचालकांची आर्त हाक; मोपावरील शुल्कवाढीबद्दल तीव्र नाराजी

Goa CAG Report: गोवा राज्याला 65.83 कोटींचा फटका! ‘कॅग’ अहवालाने ठेवले भोंगळ कारभार, भ्रष्ट प्रवृत्तीवर बोट

Sound Limit: 'गोव्यात ध्वनिमर्यादा रात्री 11 वाजेपर्यंत वाढवा'! TTAG ची मागणी; नियोजनाअभावी ‘सनबर्न’ गेल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT