Chorla Ghat Update Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat: धुक्यात हरवला चोर्ला घाट! पावसाने बदलले रुपडे; निसर्गप्रेमींना आल्हाददायक प्रवास अनुभवण्याची संधी

Monsoon in Chorla Ghat: सकाळी व संध्याकाळनंतर घाट रस्त्यात धुक्याची दाट चादर असते. पाऊस सुरू असेल तर ढगांची डोंगरांशी झालेली लगट दिसून येते.

Sameer Panditrao

वाळपई: सत्तरी तालुक्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील निसर्ग बारमाही विविध अंगाने बोलतो. येथील डोंगर, नद्या आणि ग्रामिण वस्त्या सगळ्यांनाच लुभावतात. सत्तरीचा निसर्ग अनुभवायचा तर पावसाळ्यात एकतरी फेरफटका चोर्लाघाट मार्गात मारायला हवा.

गेले काही दिवस पडणाऱ्या पावसाने येथील निसर्गाला नवे रुप दिले आहे. घाटमार्गातील धबधबे जरी अजून ओसंडून वाहत नसले तरी धुक्याच्या दुलईत हरवलेला प्रवास नवा अल्हाद निर्माण करतो. निसर्गप्रेमींसाठी हा एक सुखद अनुभव आहे.

विशेषतः सकाळी व संध्याकाळनंतर घाट रस्त्यात धुक्याची दाट चादर असते. पाऊस सुरू असेल तर ढगांची डोंगरांशी झालेली लगट दिसून येते. तसेच वारा असेल तरळत जाणारे धुके आणि त्यातून अचकीत उलगडणारा तिथला निसर्ग मन मोहवून जातो.

निसर्गप्रेमींची पावले चोर्लाघाटकडे...

गेल्या काही दिवस पडणाऱ्या पावसामुळे येथील ओढे, ओहोळ संथ गतीने वाहू लागले आहेत. पण येथील धबधबे ओसंडून व्हायला अजून पावसाचा जोर वाढणे आवश्‍यक आहे. तरीही येथील ओला निसर्ग सध्या निसर्गप्रेमींना खुणावू लागला आहे. अनेकांची पावले चोर्लाघाट मार्गाकडे वळू लागली आहेत. इथले धबधबे ओसंडून वाहू लागले की निसर्गप्रेमींची गर्दी ओसंडून वाहणार आहे.

रात्री उशिरा प्रवास टाळा

पावसाळ्यात या घाटमार्गाने प्रवास करताना वाहनचालकांना खूप सावधगिरी बाळगावी लागते. दाट धुके असेल तर गती मंद ठेवावी लागते. विशेषतः रात्री उशिरा या मार्गाने प्रवास टाळलेला बरा. त्यामुळे रात्री उशिरा या मार्गावर धावणारी अवजड वाहने एकतर घाटाखाली किंवा घाटाच्या वर विसावा घेतात व सकाळी मार्गस्थ होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

Goa Cancer Hospital: 'कॅन्‍सर इस्‍पितळ' वर्षभरात कार्यान्‍वित होणार! मंत्री राणेंनी दिली हमी; सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

SCROLL FOR NEXT