Chorao Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Chorao Ferryboat: महिनाभरापूर्वी बुडालेली फेरीबोट झाली दुरुस्त, ‘बेती’ पुन्हा सेवेत दाखल

Chorao Beti Ferryboat: चोडण धक्क्यावर रात्री नांगरलेली असताना महिनाभरापूर्वी बुडालेली बेती फेरीबोट आता पाण्यातून बाहेर काढून दुरुस्त करण्यात आली असून पुन्हा सेवेत दाखल झाली आहे.

Sameer Panditrao

पणजी: चोडण धक्क्यावर रात्री नांगरलेली असताना महिनाभरापूर्वी बुडालेली बेती फेरीबोट आता पाण्यातून बाहेर काढून दुरुस्त करण्यात आली असून पुन्हा सेवेत दाखल झाली आहे.

महिनाभरापूर्वी झालेल्या या दुर्घटनेनंतर फेरीबोटला पाण्याखालून सुरक्षितरीत्या बाहेर काढून मरिन वर्कशॉपमध्ये दुरुस्ती करण्यात आली. आवश्यक दुरुस्ती पूर्ण होताच ती पुन्हा पाण्यात उतरवण्यात आली व चोडण येथून सेवेला सुरवात करण्यात आली.

या घटनेबाबत सरकारच्या मंजुरीनंतर विभागीय (खात्यांतर्गत) चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत दुर्घटनेचे कारण, देखभाल व्यवस्थेतील त्रुटी आणि जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

स्थानिक प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यावर भर देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT