Cutbona Jetty Dainik Gomantak
गोवा

Cutbona Jetty: 'कुटबण जेटी'वर तातडीने स्वच्छतेची मोहीम! सरकारतर्फे कामगारांसाठी शुद्ध पाणी व मोफत स्वच्छतागृहे

Cutbona Jetty Cholera: मत्स्यव्यवसायाशी संबंधित मोठ्या प्रमाणावर कामकाज या जेटीवर होत असल्याने येथील स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे होते.

Sameer Panditrao

पणजी: कुटबण येथील जेटी परिसरात झालेल्या कॉलराच्या लागणीनंतर राज्य सरकारने तातडीने स्वच्छतेची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्यव्यवसायाशी संबंधित मोठ्या प्रमाणावर कामकाज या जेटीवर होत असल्याने येथील स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे होते.

सचिवालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॉलरवर काम करणाऱ्या कामगारांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आरओ फिल्टरद्वारे पेयजलाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे कामगारांना अस्वच्छ पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळणार आहे.

त्याचबरोबर जेटीवर असलेली स्वच्छतागृहे ट्रॉलरवरील कामगारांना मोफत वापरता येतील, अशी सोय करण्यात आली आहे. यामुळे स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. पूर्वी अनेक कामगारांना स्वच्छतागृहाच्या कमतरतेमुळे अडचणींना सामोरे जावे लागत होते.

कुटबण जेटी परिसरात नियमित स्वच्छता राहावी म्हणून कचरा वेळोवेळी हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली आहे. मासळी बाजारपेठेतील व ट्रॉलरमधून तयार होणारा कचरा वेळेवर उचलून टाकण्यात येईल, ज्यामुळे दुर्गंधी व संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होणार आहे.

समुद्रकिनारी व बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न नेहमीच गंभीर ठरत असल्याने या स्वच्छता मोहिमेमुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. भविष्यात होणाऱ्या आजाराबाबत ते दक्ष राहतील, काळजी घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT