Cholera Cases increase
गोवा

Cutbona Fishing Jetty: कुटबण जेट्टी आणि मोबोर किनारपट्टीवर कॉलेराचे थैमान, रुग्णांचा आकडा १००च्या पार गेल्याने परिस्थिती बिकट...

Cholera Cases at Cutbona-Mobor Increased: कॉलेराच्या आजाराने १००री पार केलेली असून गेल्या दोन आठवड्यात पाच मच्चीमारांनी जीव गमावला असल्याची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: सासष्टी तालुक्यात कुटबण जेट्टीवर सध्या विविध रोगांचे थैमान सुरु आहे. डेंग्यू, मलेरिया नंतर आता कॉलेराच्या आजाराने १००री पार केलेली असून गेल्या दोन आठवड्यात पाच मच्चीमारांनी जीव गमावला असल्याची शक्यता आहे.

मच्छिमारांना होणाऱ्या या विविध रोगांवर आळा बसवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून पाऊले उचलली जात असून कॉलरा किंवा इतर आजारांमुळे आणखीन बळी जाऊ नयेत म्हणून मंत्रालय कार्यरत आहे.

माध्यमांना आरोग्य मंत्रालयाकडून मिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत कुटबण जेट्टीवर काम करणाऱ्या २७ तर मोबोर किनारपट्टीवर काम करणाऱ्या ८ मच्छिमारी कर्मचाऱ्यांना कॉलेराची लागण झाली आहे.

सदर ठिकाणाहून दररोज ८ ते १० नवीन रुग्ण समोर येतात तर यांपैकी किमान ४ जणांना त्वरित उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये हलवणे अनिवार्य झाले आहे.

आत्तापर्यंत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय आणि गोवा मेडिकल कॉलेजमध्ये १०८ पैकी ३० रुग्णांवर उपचार सुरु असून ५० रुग्ण सुखरूप असल्याची माहिती मिळते.

कुटबण जेट्टी आणि मोबोर किनारपट्टीवर काम करणारे मच्छिमारी हे बऱ्यापकी झारखंड, छत्तीसगढ आणि ओडिशाच्या भागांमधून आले.

राज्य महामारी तज्ज्ञ डॉ. उत्कर्षा बेतोडकर यांनी एका इंग्रजी वृत्तसेवेला दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यात या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

हे मच्छिमारी किमान सात दिवसांसाठी समुद्रात कामासाठी जात असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात उशीर होतो आणि परिणामी त्वरित उपचार सुरु करता येत नाहीत. रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांना दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयातील विशिष्ठ वॉर्डमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोया केली गेली आहे.

हा रोग जीवाणू हात किंवा नखांवर राहिल्याने पसरतो आणि केवळ स्वच्छतेचा अवलंब करून यावर मात केली जाऊ शकते असेही डॉ. उत्कर्षा पुढे म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऑफिसमध्ये फक्त कामच! कामाच्या वेळी 'बर्थडे' आणि 'फेअरवेल' साजरे करण्यावर बंदी

Goa Live News: धारगळ दोन खांब ते आरोबा हॉट मिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ

"ही राजकीय नाही, गोवा वाचवण्‍याची चळवळ"! निवृत्त न्‍या. फर्दिन रिबेलोंची हाक; वाचा घोषणापत्र आणि महत्वाचे मुद्दे..

Goa Road Projects: गोव्‍यासाठी 7076 कोटींच्‍या रस्त्यांचा प्रस्‍ताव गडकरींना सादर! मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

Goa AAP:‘आप’ला गोव्यात लागलेल्या गळतीचे कारण दिल्लीतील नेतृत्व! कार्यकर्त्यांमध्ये बळावली भावना; पक्षाची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त

SCROLL FOR NEXT