South Goa : दक्षिण गोव्यावर भाजपची वक्रदृष्टी : ​​युरी आलेमाव

Yuri Alemao : सनबर्न आयोजकांवर एफआयआर नोंदवा
South Goa yuri Alemao
South Goa yuri Alemao Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी, सनबर्न फेस्टिव्हलच्या अधिकृत व्हेरिफाईड एक्स हँडलवर प्री-सेल तिकिटांसाठी नोंदणी करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोवा सरकारच्या मान्यतेशिवाय जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे धाडस करतील की तेच या मॅच फिक्सिंगचा भाग आहेत? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

उत्तर गोव्याचे ड्रग अँड क्राइम हबमध्ये रुपांतर केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची आता दक्षिण गोव्यावर वक्रदृष्टी पडली आहे.

South Goa yuri Alemao
Goa Monsoon 2024: डिचोलीत कारमध्ये अडकलेल्या 'त्या' महिलेची पाच तासांनी सुटका

२०२४ मध्ये दक्षिण गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी देऊन लोकसभा पराभवाचा बदला घेण्याचा हा भाजपचा डाव आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

भाजप सरकारचे सनबर्न आयोजकांशी साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच दक्षिण गोव्यात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सनबर्न फेस्टिव्हलने दिलेल्या जाहिरातीवर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.

सनबर्नला गोव्यात कुठेही परवानगी देऊ नये. आम्ही दक्षिण गोव्यात नक्कीच मान्यता देणार नाही आणि उत्तर गोव्यातही आम्ही प्रखर विरोध करू. या फेस्टिव्हमुळे गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे आणि आता तो कायमचा बंद करण्याची वेळ आली आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com