Chimbel Protest Dainik Gomantak
गोवा

Chimbel: 'पणजीला पाण्याची गरज लागेल तेंव्हा चिंबलमधील तळे मदतीला येईल'! शिरोडकरांचा दावा; प्रकल्पांना विरोध कायम

Chimbel Protest: आझाद मैदान येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिरोडकर बोलत होते. यावेळी चिंबल ग्रामस्थदेखील उपस्थित होते. सरकार जो प्रकल्प आणू इच्छित आहे त्यासाठी त्यांना स्थानिकांच्या जमिनीच दिसत आहेत.

Sameer Panditrao

पणजी: चिंबल येथे पाणथळ जमिनीत सरकार युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ उभारू इच्छित आहे. परंतु यामुळे स्थानिक जैवविविधतेला धोका पोहोचणार असून ग्रामस्थांनादेखील विश्‍वासात घेतले गेलेले नाही. उद्या या प्रकल्पाचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन होणार आहे; परंतु प्रकल्पाला आमचा विरोध कायम असल्याचे गोविंद शिरोडकर यांनी सांगितले.

आझाद मैदान येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिरोडकर बोलत होते. यावेळी चिंबल ग्रामस्थदेखील उपस्थित होते. दरम्यान, शिरोडकर म्हणाले, पोर्तुगीज कालखंडात ज्यावेळी पणजीला पाणी अपुरे पडले त्यावेळी चिंबलमधील तळ्याने पणजीवासीयांची तहान भागविली आहे.

ज्यावेळी पणजीला पाण्याची गरज लागेल त्यावेळी या तळ्याद्वारे ती भागविण्यात येणार आहे. सरकार चिंबल येथे जो प्रकल्प आणू इच्छित आहे त्यासाठी त्यांना स्थानिकांच्या जमिनीच दिसत आहेत.

जर सरकारला वाटते की युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ चिंबलमध्ये व्हावा तर तो इंदिरानगर येथे उभारण्यात यावा. जैवविविधतेची हानी करून हे आम्हाला प्रकल्प नकोत, असे अजय खोलकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT