Chimbel Protest Dainik Gomantak
गोवा

Chimbel Protest: चिंबलवासीयांचा आक्रोश! आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंचांच्या घरांवर मोर्चा; युनिटी मॉलविरोधात फुंकले रणशिंग

Chimbel Unity Mall: पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घराबाहेरच अडविले. त्यामुळे मोर्चेकरांनी तेथेच ठिय्या मांडला. त्यानंतर हा मोर्चा जिल्हा पंचायत सदस्या गौरी कामत व सरपंच संदेश शिरोडकर यांच्या घरांकडे वळविण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : चिंबल येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या तीव्र आंदोलनाचा भाग म्हणून रविवारी आंदोलनकर्त्यांनी आमदार, जिल्हा पंचायत सदस्य व सरपंचांच्या घरांवर मोर्चा काढत युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ हे दोन्‍ही प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी केली.

मेरशी चौकात सकाळी लोक एकत्र जमू लागले. सव्वादहाच्या सुमारास मोर्चा आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या घरावर नेण्यात आला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घराबाहेरच अडविले. त्यामुळे मोर्चेकरांनी तेथेच ठिय्या मांडला. त्यानंतर हा मोर्चा जिल्हा पंचायत सदस्या गौरी कामत व सरपंच संदेश शिरोडकर यांच्या घरांकडे वळविण्यात आला.

चिंबल जैवविविध समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर म्हणाले की, युनिटी मॉल व प्रशासन स्तंभाला विरोध म्हणून आम्ही उपोषण सुरू केले आहे. सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने आम्हाला हा मोर्चा काढावा लागला. हा आमचा हक्काचा लढा आहे.

कोण काय म्हणाले?

  वाल्मिकी नाईक (आप प्रदेशाध्यक्ष) : एकही मंत्री चिंबलमध्ये लोकांना भेटायला आलेला नाही. लोक वापरत नाहीत म्हणून तळी आणि राने संपवायची ही सरकारची मानसिकता आहे.

  अजय खोलकर (आरजी) : हरमल, करमळीत आंदोलनामुळे प्रकल्प थांबले; मग चिंबलकरांना का लढावे लागत आहे?

  शायनी ओलिव्हेरा (माजी जिल्हा पंचायत सदस्य) : चिंबल गावात अनेक समस्या आहेत. त्‍या सोडविण्‍यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, पण युनिटी मॉलसाठी आहेत.

आंदोलनाची पुढील दिशा

  १३ जानेवारी :  पंचायतीत जाऊन विचारणार जाब

  १४ जानेवारी :  न्यायालयीन निकाल अपेक्षित

  १५ जानेवारी :  विधानसभेवर शांततामय मोर्चा

प्रतिकूल निकाल आल्यास उच्च न्यायालयात दाद

या आंदोलनाला ‘आरजी’ची फूस आहे. आंदोलनकर्त्यांनी सभांमध्ये शिवीगाळ केल्यामुळे संवाद साधणे अवघड झाले. प्रकल्पामुळे तोय्‍यार तळ्याला हानी होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलनकर्त्यांना सरकारने चर्चेसाठी बोलावले, पण ‘आरजी’ने त्‍यांना रोखले.
रुडॉल्‍फ फर्नांडिस, आमदार (सांताक्रुझ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT