Goa Waste Management Dainik Gomantak
गोवा

Chimbel: 'नागरिकांच्या आरोग्याला कोणी वाली आहे की नाही'? चिंबलवासियांचा प्रश्न; कचऱ्याची गंभीर समस्या

Chimbel waste issue: चिंबल येथील उड्डाणपुलाच्या एका मार्गाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या पंचायत क्षेत्रातील कचऱ्याच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: चिंबल कचरामुक्त करण्याची पंचायत मंडळाची घोषणा ही घोषणाच राहत आहे. वारंवार कचरा मुक्तीचा संदेश देऊनही पंचायत क्षेत्रात रस्त्यांच्या बाजूला कचरा टाकणे काही थांबत नाही. रस्त्याच्या बाजूला कचऱ्यांच्या राशी दिसत असून सध्या गावातील स्थिती भयावह असल्यासारखे चित्र आहे.

चिंबल मंचच्या सदस्यांनी सांगितले की, आज रस्त्याच्या बाजूला कचऱ्याच्या ज्या पद्धतीने राशी दिसून आल्या, त्यावरून येथील नागरिकांच्या आरोग्याला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न पडत आहे. याशिवाय विकासाचे कारण देत काँग्रेस पक्षातून सत्ताधारी आमदार रुडॉल्फ फर्नांडिस भाजपमध्ये गेले, पण त्यांनी कचऱ्याच्या विषयाकडे कानाडोळाच केलेला दिसतो.

चिंबल येथील उड्डाणपुलाच्या एका मार्गाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या पंचायत क्षेत्रातील कचऱ्याच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली होती, याची आठवण मंचच्या सदस्यांनी करून दिली आहे.

चिंबल येथील कचऱ्यांच्या राशी पाहिल्यानंतर डबल इंजिन सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सदस्यांनी केली आहे. याशिवाय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याकडे लक्ष घालावे. चिंबल गाव स्वच्छ रहावा यासाठी प्रयत्न केले जावेत, यासाठी सरकारी खात्यांना सूचना कराव्यात असेही चिंबल मंचच्या सदस्यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: व्यवसाय, नोकरी अन् बँक बॅलन्स..! मंगळाचे नक्षत्रांतर 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

SCROLL FOR NEXT