पणजी: चिंबल येथील इंदिरानगर प्रभागामधील पंचसदस्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे त्यांनी व्यक्त केलेल्या मतावर चिबल मंचने आक्षेप घेतला आहे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे ही बाब पोहोचवली आहे. तसेच या व्हिडिओवरून ‘माझे घर कायदेशीर केल्याने राज्यातील गुन्हे कमी होतील काय?, असा प्रश्नही मंचने उपस्थित केला आहे.
चिंबल मंचचे सचिव टी. कुंकळ्ळकर यांच्या यांनी पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, तुम्हाला आता ‘माझे घर'' योजनेच्या नावाखाली बेकायदेशीर गोष्टी कायदेशीर करण्याचा परिणाम जाणवला असेल.
गोव्यात आधीच कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे आणि असे दिसते की तुम्हाला याचा परिणाम (माझ्या घर परिणाम) आधीच समजला असेल. कदाचित गोवा सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू केल्यामुळे असे झाले असावे!
असेही आश्चर्य त्यांनी व्यक्त केलेले आहे. मंचच्या सचिवाने आपल्या पोस्टला जोडलेल्या व्हिडिओतील युवक हा इंदिरा नगर-चिंबलचा स्थायी पंच आहे. चिंबल सरपंच संदेश शिरोडकर यांचा समर्थक आहे. चिंबल मंच ग्रामसभेत हा विषय नक्कीच मांडेल, असे म्हटले आहे.
दरम्यान, जो व्हिडिओ क्लिप या पोस्टद्वारे जोडलेली आहे, त्यात युवक आपला जन्म गोव्यात झाला आहे आणि गोवा पुढे नेण्यासाठी सर्वांनी काम करावे. ‘घाटी‘वरून जो वाद सुरू झाला आहे, तो योग्य नाही. याशिवाय त्याने टीकाकारांना संविधानाची आठवणही करून दिली आहे.
त्याचबरोबर आपण यापूर्वी केलेल्या व्हिडिओवरून आपणास बरेच काही वाईट बोलले गेले आहे. परंतु ज्यांना काही बोलायचे आहे त्यांनी समोर येऊन बोलावे, असे आव्हानही त्या युवकाने दिले आहे. या व्हिडिओला आता मंचने आक्षेप घेतल्याचे दिसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.