Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: स्वयंसहाय्य गटाला दिवाळीचे पदार्थ विकण्यास चिखली पंचायत सचिवाचा विरोध...

दैनिक गोमन्तक

वास्को: चिखली येथे स्वयंसहाय्य गटाला दिवाळीचे पदार्थ विकण्यास चिखली पंचायत सचिवाने आडकाठी आणल्याने गोंधळ उडाला. स्वयंसहाय्य गटाच्या महिलांनी निषेध व्यक्त केला. चिखली पंचायतीचे माजी पंच सदस्य पेद्रो दोमियाव रॉड्रीग्स यांच्याविरुद्र पंचायत सचिवांच्या तक्रारीनुसार रॉड्रीग्स याला अटक व नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

(Chikhli Panchayat Secretary's opposition to selling Diwali food to Self Help Group)

कॉंग्रेसचे नेते कॅप्टन विरीयातो फर्नांडीस, चिखली पंचायत पंच सदस्य फ्रान्सिस नुनिस, माजी सरपंच सेबेस्ताव पेरेरा स्वयंसहाय्य गटाच्या मदतीला धावून आले. यावेळी पोलिस बळाचा वापर करण्यात आल्याने पंचायत सचिवा विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.

दिवाळी सणासाठी लागणाऱ्या गोड पदार्थ विक्रीसाठी येथील स्वयंसहाय्य गटाच्या सुमारे 20 महिलांनी चिखली येथे मुख्य नाक्या शेजारी मंडप घातला व त्यांनी दिवाळीचे साहित्य विकण्यास ठेवले असता त्याठिकाणी चिखली पंचायतीचे सचिव अम्रीत साखळकर येऊन त्यांना दुकान थाटण्यास आडकाठी आणली व त्यांचाकडे नौदल परवाना व चिखली पंचायतीचा परवाना मागीतला. यावर महिलांनी नाराजी व्यक् केली. नौदलांकडून परवानगी कशाला असाही प्रश्न केला. मात्र सचिव आपल्या मतावर ठाम राहीला. यावेळी पोलिस बळाचा वापर केल्याने महिलां आणखी भांबावल्या.

दरम्यान याची माहिती काँग्रेसचे नेते विरीयातो फर्नाडिस, चिखली पंचायत पंच सदस्य फ्रान्सिस नूनिस, माजी सरपंच सेबेस्तांव पेरेरा आदी घटनास्थळी धावून आले. त्यांनी सचिवाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सफल झाला नाही. सदर प्रकरण पोलिस स्थानकावर पोचले यात माजी पंच सदस्य पेद्रो दोमियाव याला अटक करण्यात आली. नंतर आज त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

दरम्यान चिखली पंचायत सचिवाच्या या धोरणा विरुद्ध नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर मंडप नौदलला कोणतीही आडकाठी येत नाही. तरीही सचिव नौदलाचे नाव घेऊन सदर दिवाळीचा बाजार घालण्यास स्वयंसहाय्य गटाला आडकाठी आणत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारतर्फे स्वयंमपूर्ण होण्यासाठी महिला मंडळातील स्वयंसहाय्य गटांना प्रोत्साहन देण्याचे फक्त कागदावर तेवढेच शिल्लक आहे. प्रत्यक्षात मात्र महिला स्वयंसहाय्य गटावर अन्याय होत असल्याची जोरदार टिका समाज कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी केली. दाबोळी चिखली मुख्य सर्कल जवळील श्री महादेव मंदीरा समोर याच भागातील महिलांनी दिवाळी सणानिमित्त विविध खाद्य पदार्थ तयार करून, येथे मंडप उभारून विक्री करण्यासाठी ठेवले होते. पण दृढ राजकारणी चिखली पंचायतीच्या सत्ताधारी पंच सदस्य व सचिवाने सूड बुद्धिने येथील स्वयंसहाय्य गटाच्या खाद्यपदार्थ मंडप काढण्याचा आदेश देण्यात आला.

यावेळी चिखली पंचायतीचे माजी सरपंच सेबेस्ताव परेरा, माजी पंच पेंद्रू दामियाव रॉड्रिगीस व इतरानी येथील स्वयंसहाय्य गटाना पाठिंबा दिला असता, माजी पंच पेंद्रू दामियांव रॉड्रिगीस याला पोलिसांनी अटक केली. हे कृत्य चुकीचे असून राज्य सरकारने महिलांना स्वालंबी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहीजे. मात्र सरकारच स्वावलंबी होण्यापासून महीलांना रोखत असल्याची माहिती शंकर पोळजी यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT