Chikhli Fuel Leak  Dainik Gomantak
गोवा

Chikhli Fuel Leak : चिखली परिसरात इंधन गळती सुरूच ! कंपनी, प्रशासनाची अनास्था

Chikhli Fuel Leak : प्रदूषण’,‘एमपीए’च्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह

गोमन्तक डिजिटल टीम

Chikhli Fuel Leak : वास्को,दाबोळी चिखली व्हडले भाट परिसरात ५४ दिवस उलटून गेले तरी भूमिगत इंधन गळती सुरूच असल्याने कॉंग्रेस नेते कॅप्टन विरीयातो फर्नांडिस यांनी जुआरी इंडियन ऑईल अदानी वेन्चर कंपनी,

दक्षिण गोवा आपत्कालीन व्यवस्थापन समिती, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य जलस्त्रोत विभाग, राज्य आरोग्य यंत्रणा व मुरगाव पत्तन प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर (एमपीए) संशय व्यक्त केला आहे.

चिखली व्हडले भाट परिसरात दिवसेंदिवस पेट्रोल - डिझेल मिश्रीत इंधनाचा वास अधिकच येत असल्याने बुधवार (दि.३) गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे नेते कॅप्टन.

विरीयातो फर्नांडिस, चिखलीचे पंच फ्रान्सिस नूनीस, पंच रोमन वाझ, माजी सरपंच प्रताप म्हार्दोळकर, माजी सरपंच सेबेस्ताव परेरा, माजी उपसरपंच हेमंत फडते, माजी जिल्हा पंचायत सदस्य गोपी नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

चिखली व्हडले भाट परिसरातून भूमिगत इंधन गळती होऊन येथील विहिरी,नाले, शेत जमिनीतून झुआरी नदीत पोहोचले असून याविषयी मुरगाव पत्तन प्राधिकरणाने (एमपीए) जुआरी इंडियन ऑईल अदानी वेन्चर कंपनीवर कोणती कारवाई केली असा प्रश्न कॅ.फर्नांडिस यांनी उपस्थित केला आहे.

कारण ‘एमपीए’ ने जुआरी नदीच्या बाजूस असलेले छोटे बंदर त्यांच्या हृद्दीत येत असून, त्यांनी संबंधित कंपनीवर कारवाईबाबत कोणती भूमिका घेतली.याविषयी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. फर्नांडिस यांनी एमपीएसह गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य जलस्त्रोत विभागालाही प्रश्न केला आहे.

चिखली व्हडले भाट मध्ये इंधन गळतीमुळे संपूर्ण जमीन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. येथील जमिनीतील पाणी पूर्णपणे प्रदूषित होत चालले आहे. यावर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.तसेच नाले, शेत जमिनी खराब होत आहे. यावर जलस्त्रोत खात्याने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी फर्नांडिस यांनी केली आहे.

इंधन समुद्रात गेल्यास मोठी हानी !

जुआरी इंडियन ऑईल अदानी वेन्चर कंपनीने येथील जनतेला प्रदूषणाच्या विळख्यात ढकलले आहे.यावर दक्षिण गोवा आपत्कालीन व्यवस्थापन समितीने यावर त्वरित उपाय योजना आखावी.

तसेच चिखली व्हडले भाट भागातून भूमिगत इंधन गळती जुआरी नदीत जाण्याची शक्यता आहे. जर इंधन समुद्रात गेल्यास निर्सगाची मोठी हानी होणार असल्याची भीती कॅ. विरीयातो फर्नांडिस यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT