Chikhali Sports Club program Dainik Gomantak
गोवा

चिखली स्पोर्टस् कल्ब: 'तुमच्या हक्कासंबंधी- तुमचा आवाज ऐका'

'प्रत्येक ग्रामस्थाने ग्रामसभांमध्ये सहभागी होणे गरजेचे'

दैनिक गोमन्तक

वास्को: लोकशाहीच्या परिणामकारक वाढीसाठी प्रत्येक ग्रामस्थाने ग्रामसभांमध्ये सहभागी होणे गरजेचे असल्याचे गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन्स यांनी सांगितले. त्यांनी ग्रामसभेची भूमिका व ग्रामसभा ही गावाच्या विकास कार्यात कशी उत्प्रेरक असते, याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. चिखली बायो-क्रुसेडर्सने 'तुमच्या हक्कासंबंधी- तुमचा आवाज ऐका' या शीर्षकाखाली ग्रामपंचायती व ग्रामसभांमध्ये जनजागृती कार्यक्रम चिखली स्पोर्टस् कल्बच्या प्रांगणात आयोजित केला होता. याप्रसंगी मार्टिन्स बोलत होते. अर्ध्या दिवसाच्या या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. चिखली, दाबोळी, चिकोळणा बोगमाळो, कुठ्ठाळी, झुआरीनगर, मडगाव, वेर्णी, कासावली, म्हापसा, बेतोडा, शिरोडा, शिवोली, गिरदोली, सेट जुझे द आरिएल येथील काही ग्रामस्थ सहभागी झाले होते.

याप्रसंगी तळागाळातील विकास, ग्रामपंचायत पंचायत विकास, स्तरावर लोकशाही बळकट करणे, ग्रामपंचायतीमध्ये पंच का व कसे व्हावेत यासंबंधी चर्चा करण्यात आली. मार्टिन्स यांनी उपस्थितांना पंचायत कामकाज, ग्रामसभांची भूमिका, विविध समित्यांची भूमिका व समिती सदस्यांची कर्तव्ये व जबाबदारी यासंबंधी सखोल माहिती दिली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी चिखलीच्या माजी पंच डॉ. अँटोनिटा फिगरेदो ई फनांडिस, सिंथिया लिमा लितांव ई मिरांडा, अंकिता सातार्डेकर,फादर मायकेल फर्नांडिस उपस्थित होते. फर्नांडिस यांनी आपल्या कार्यकाळात पंचायत ज्ञानाअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते, अशी आठवण सांगितली. काविना फर्नांडिस यांनी सूत्रसंचालन केले.

चिखली बायो-क्रुसेडर्सचे संयोजक सिरिल फर्नांडिस यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. अनेक ग्रामस्थांनी अशा प्रकारच्या जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंबंधी चिखली बायो क्रुसेडरशी संपर्क साधला होता. आगामी पंचायत निवडणुकीत संबंधित पंचायतमीमध्ये चांगले व प्रभावी पंचायत प्रतिनिधी निवडण्यासाठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT