जीएसआर दरांत सुधारणा करू: निलेश काब्राल

बिल्डर्स असोसिएशनने सरकारला सहकार्य करण्याची सूचना
Nilesh Cabral News
Nilesh Cabral NewsDainik Gomantak

सासष्टी: बांधकाम साहित्य किंमतीत वाढ झाल्याने जीएसआर दर सुधारणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे जीएसआर दरांमध्ये सरकारकडून सुधारणा करण्यात येणार आहेत. बिल्डर्स असोसिएशनने त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांनी केले.

मडगाव बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया गोवा केंद्रातील नव्या पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण सोहळा झाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री काब्राल उपस्थित होते. यावेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष निमेश पटेल, उपाध्यक्ष राजेंद्र आठवले, माजी उपाध्यक्ष निरव परमार उपस्थित होते.

Nilesh Cabral News
फोंड्यात मान्सूनपूर्व कामे खोळंबली

गोव्यात कौशल्य केंद्र सुरू करण्यासाठी सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी, असे बिल्डर्स असोसिएशनने मागणी केली होती. त्यावर बोलताना मंत्री काब्राल म्हणाले की, जागा उपलब्ध करणे कठीण जाईल. पण, गोव्यामधील आयटीआयमध्ये कौशल्य साधन सुविधांमध्ये वाढ करण्यासाठीही बिल्डर्स असोसिएशनने मदत करावी. बिल्डर्स तसेच बांधकाम उद्योगातील संबंधितांच्या गरजा भागविण्यासाठी नवी पद्धती व तंत्रज्ञानाचा विकास केला जाईल, असेही मंत्र्यांनी सांगितले.

नूतन कार्यकारिणीची निवड

2022-23या एका वर्षाच्या कालावधीसाठी निवडण्यात आलेले कार्यकारिणीवरील पदाधिकारी असे ः इं. यतिन पाल (अध्यक्ष), इं. गजानन एस. सावंत (उपाध्यक्ष), इं. त्रिविक्रम प्रभुगावकर (मानद सचिव), इं. तेजस तालक (मानद खजिनदार), जनरल कौन्सिल सदस्य इं. निरेश नाईक, कार्यकारी समिती सदस्य - संतोष जॉर्ज, कृष्णा शेट्ये, इं. गौरव खंवटे यांची निवड करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com