Chikhali Dabolim water problem

 

Dainikgomantak

गोवा

चिखली दाबोळीत पाण्याचा प्रश्न, 10 हजाराहून अधिक नागरिक त्रस्त

संबंधितांनी या गंभीर विषयावर त्वरित लक्ष घालून समस्या सोडवावी नागरिकांची मागणी

दैनिक गोमन्तक

वास्को : चिखली दाबोळी येथील एका दुर्मिळ अवस्थेतील पाण्याच्या टाकीतील गढूळ पाणी जनतेला प्यावे लागत असल्याने आरोग्य विषयक समस्या निर्माण झाली आहे. यावरून चिखली वासियांना नाराजी व्यक्त करून संबंधितांनी याविषयी त्वरित लक्ष घालून टाकीचा सोक्षमोक्ष लावून या ठिकाणी नवीन टाकी उभारावी अशी मागणी केली आहे. दाबोळी मतदार संघातील चिखली उपजिल्हा इस्पितळाच्या मागे दाट लोकवस्तीत सुमारे 20 वर्षांपूर्वी बांधलेली पाण्याची टाकी असून संबंधितांकडून त्या टाकीची देखभाल न झाल्याने या टाकीची दुर्मिळ अवस्था झाली आहे. ही टाकी झाडाझुडपांनी व्यापलेली आहे. 02 ऑगस्ट 2000 साली विद्यमान मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुभाष शिरोडकर तसेच महसूल मंत्री माविन गुदिन्हो व चिखली सरपंच शुभदा पवार यांच्या उपस्थितीत या टाकीचे लोकार्पण केले होते.

दरम्यानच्या काळात एकदाच या टाकीची साफसफाई केल्याच लोकांकडून सांगण्यात आले. त्यानंतर संबंधितांनी या टाकीकडे ढुंकूनसुद्धा पाहिले नसल्याचे स्थानिकांनी सांगून नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी आणखी एक ओव्हर हेड पाण्याची टाकी होती. ती भग्नावस्थेत पोहोचली होती. तसेच पाडण्याच्या मार्गावर होती. ही टाकी दाट लोकवस्तीत असल्याने स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर येथील टाकी हल्लीच पाडण्यात आली. या ठिकाणी नवीन टाकी उभारण्यात येईल असे या लोकांना आश्वासन संबंधित खात्याकडून देण्यात आले होते. मात्र ते आश्वासन हवेतच विरून गेले. दरम्यान या ठिकाणी असलेली दुसरी टाकी ही आता भग्नावस्थेत पोचली असून या टाकीला गळती लागली आहे. तसेच या टाकीची कित्येक वर्षापासून संबंधितांकडून निगा राखली नसल्याने या टाकीत चिखल तयार झाला आहे. येथील लोकांना चिखलाचे पाणी सोडले जाते. तसेच पाणी मिळावे तर मिळाले नाही तर पाणीच नसते.

सुमारे 10 हजाराहून अधिक दाबोळीवासिय या टाकीतील पाण्याचा (water) उपयोग करतात. मात्र पाणी येत नसले तर या टाकी चा काय उपयोग. तसेच या टाकीत चिखल निर्माण होऊन जंतू निर्माण झाल्याचा दावा येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. यावर तातडीने उपाययोजना आखण्याची मागणी स्थानिकाकडून होत आहे. दरम्यान येथील समाजसेवक तुळशीदास फळदेसाई यांनी लोकांच्या या समस्येकडे संबंधितांनी गांभीर्याने पाहणे फार गरजेचे आहे. ही पाण्याची टाकी दुर्मिळ झाल्याने लोकांना घाण पाणी सोडले जाते. यामुळे लोकांच्या आरोग्यावर भयावह परिणाम होणार. या दूषित पाण्यामुळे कसला रोग उद्भवणार हे लोकांना माहिती सुद्धा पडणार नाही. तेव्हा संबंधितांनी लोकांच्या या गंभीर विषयावर त्वरित लक्ष घालून समस्या सोडवण्यास यावी अशी विनंती केली आहे.

टाकी साफ करायला घेतली तर दोन ट्रक भर चिखल काढला जाईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तेव्हा सदर भग्नावस्थेत पोचलेली ताकी त्वरित हटवून त्या ठिकाणी नवीन टाकीची व्यवस्था करावी अशी मागणीही यावेळी समाजसेवक तुळशीदास फळदेसाई यांनी केली. तसेच दाबोळी (Dabolim) मतदार संघातील नवेवाडे येथे असलेल्या दोन टाक्या व बोगमाळो येथील टाकीचीही साफसफाई करण्यात यावी अशीही मागणी तुळशीदास फळदेसाई यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

रडून – रडून 5 किलो वजन घटले, बायको जिवंत मुडद्यासारखी झालीय; गोव्यातल्या 'त्या' नाईट कल्ब डान्सरचा पती भावूक

शूटिंगनंतर कुठे गायब झालाय अक्षय खन्ना? 167 कोटींची मालमत्ता असलेला 'रहमान' राहतोय अलिबागमध्ये; स्वर्गाहून सुंदर फार्महाऊस!

Goa Fire: थिवीत 'अग्निकांड', शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; 5 लाखांचे नुकसान!

Goa Live Updates: उपसरपंच सुषमा नागवेकर यांच्यासह तीन पंचायती सदस्य चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये

SCROLL FOR NEXT