Viva Goa Carnival 2024 Curtain Raiser Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival: ‘कार्निव्हल’मधून सामाजिक सलोख्याचे दर्शन; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa Carnival: पणजीत भव्‍य मिरवणूक; आकर्षक चित्ररथांनी वेधले लोकांचे लक्ष

दैनिक गोमन्तक

Goa Carnival: देशात केवळ गोव्यातच कार्निव्हलसारखा महोत्‍सव आयोजित केल्या जातो. त्यामुळे देश-विदेशातील लोक हा उत्सव पाहण्यासाठी गोव्यात येत असतात. यंदाही पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

‘खा, प्या, आणि मजा करा’ असा संदेश ‘किंग मोमो’ देत असतो. त्यामुळे नागरिकांमध्‍ये प्रचंड उत्साह आणि नवी उमेद निर्माण होते. हा महोत्‍सव सामाजिक सलोखा जपतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आज शनिवारी संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास येथील जुन्या सचिवालयाकडून कार्निव्‍हल मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्‍यानंतर मुख्‍यमंत्री बोलत होते.

यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार जेनिफर मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी बावटा उंचावून मिरवणुकीला प्रारंभ केला आणि राज्‍यात किंग मोमोची राजवट सुरू झाली. रात्री 9 पूर्वी मिरवणूक विसर्जित झाली.

‘खा, प्‍या, मजा करा, पण आरोग्याची काळजी घ्या’, ‘व्यायामाने शरीर सुदृढ करा’, ‘दारू पिऊन वाहन चालवू नका’, ‘प्रदूषण टाळा, आपला वारसा सांभाळा’ असे सामाजिक संदेश देणाऱ्या चित्ररथांनी लक्ष वेधून घेतले.

नाच-गाण्यांच्या तालावर राजधानी दुमदुमून निघाली होती. मिरवणुकीच्या सुरूवातीला किंग मोमोने रथातून हात उंचावून रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या हजारो लोकांना शुभेच्छा दिल्‍या. मिरवणुकीत परदेशी पर्यटक उस्फूर्त नाचत होते. पोर्तुगाल येथील पर्यटकांचा एक गट रंगीबेरंगी वेशभूषा करून नाचून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT