Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Sudin Dhavalikar: मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ विधान योग्यच..

सुदिन ढवळीकर ः परप्रांतीय मजुरांमुळे गोव्याचे नाव बदनाम

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला काही परप्रांतीय जबाबदार असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी हल्लीच झालेल्या कामगारदिन कार्यक्रमात केले होते. ते विधान योग्य आहे.

कारण काही बेशिस्त परप्रांतीय कामगार गुन्हेगारीमध्ये अटक झालेले आहेत. सर्वच परप्रांतीय नाही. मात्र, काहीजण त्याला जबाबदार असल्याचे मत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.

गोव्यात कामगार मिळणे कठीण आहे. सुतारकाम, लाद्या बसवणे, गवंडी, बांधकामासाठी लागणारे मजूर हे यापूर्वी कंत्राटदार बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश तसेच काही महाराष्ट्रातूनही आणले जात होते. हे काम करणारे गोव्यात मजूर मिळत नव्हते.

काही परप्रांतीयांनी स्वतःच्या मेहनतीने आपला व्यवसायही सुरू केला आहे. काही राज्यात रोजगार मिळत नसल्याने ते गोव्याकडे धाव घेत आहेत. गोव्याकडे येणाऱ्या या मजुरांना कामापोटी चांगले पैसे मिळत असल्याने त्यातील काहीजण व्यसनी होत आहेत.

त्यामुळे राज्यात त्यांच्यामुळेच अनेक गुन्हे नोंदवले जात आहेत. या परप्रांतीय मजुरांमुळे गोव्याचे नाव मात्र बदनाम होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे विधान केले ते त्याला अनुसरूनच केले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

‘मजूर वळतात गुन्हेगारीकडे’

राज्यात येणारे परप्रांतीय हे चांगले व वाईटही असतात. इतर राज्यातील काही अधिकारीही उच्च पदावर आहेत. मात्र, मजूर वर्गातील लोक हे वाईट मार्गाला लागून ते गुन्हेगार बनत आहेत. त्यामुळे गोव्यात आलेल्या अशा मजुरांना ओळखपत्र सरकारने सक्तीचे केले आहे ते योग्य आहे.

ते ओळखपत्र नसल्यास त्यांना कंत्राटदारांनी कामावर ठेवू नये. काम नसल्याने काहीजण गुन्हेगारीकडे वळत आहेत, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

Goa Third District: नवा तिसरा जिल्हा आणि मुख्यालय; काब्राल यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार का मानले? काँग्रेस आमदाराचा सवाल

Operation Sindoor: 'सैनिकांच्या शौर्यासाठी टाळ्या वाजवण्यास नकार..? राहुल गांधींवर उठली टीकेची झोड; संरक्षणमंत्र्यांच्या आवाहनानंतर नवा वाद

SCROLL FOR NEXT