Save Goa Save Mhadai
Save Goa Save Mhadai Dainik Gomantak
गोवा

Save Goa Save Mhadai: मुख्यमंत्री सावंत हे सूर्याजी पिसाळ, कर्नाटकात जाऊन केलेला प्रचार पूर्णतः गोवाद्रोह

गोमन्तक डिजिटल टीम

Save Goa Save Mhadai ज्या मंचावरून कर्नाटक म्हादई पाणी वाटपाचा वाद सामंजस्याने सोडविला आणि आता आम्हाला पाणी वळविण्यापासून कोणीच रोखू शकत नाहीत असे कर्नाटकचे मंत्री उघडपणे सांगतात.

त्याचं व्यासपीठावरून ह्या सरकारला परत सत्तेवर आणा अशी मागणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत करतात, ही बाब अत्यंत दुर्दैवी असून मुख्यमंत्र्यांची कृती हा निव्वळ गोवाद्रोह असून त्यांच्या या गुन्ह्याला माफी नाही अशी प्रतिक्रीया सेव्ह म्हादई सेव्ह गोवा या संघटनेचे नेते प्रशांत नाईक यांनी व्यक्त केली.

आज मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना नाईक यांनी मुख्यमंत्री सावंत हे सूर्याजी पिसाळ असे संबोधित अशा गद्दारांस आता जनताच धडा शिकवणार असे म्हणत त्यांचा जाहीर नाही निषेध केला.

मुख्यमंत्री सावंत हे शिवाजी महाराजांचे गोडवे गातात पण प्रत्यक्षात शिवाजी महाराजांच्या राज्याला फितुरीचा सुरुंग लावणाऱ्या सूर्याजी पिसाळ यांची भूमिका निभावतात. जर कर्नाटक मंत्र्यांनी जाहिरपणे मांडलेली भूमिका आमचे मुख्यमंत्री मुकाट्याने मान्य करतात तर उद्या सर्वोच्च न्यायालयात गोव्याची बाजू कणखरपणे कसे मांडतील असा प्रश्न केला.

या आंदोलनाचे सासष्टी तालुक्याचे निमंत्रक सेराफीन कोता यांनी मुख्यमंत्री सावंत यांनी गोवेकराना कर्नाटक समोर विकले असा आरोप करतांना ज्यावेळी कर्नाटकचे मंत्री म्हादईचा प्रश्न सुटला असे म्हणत असताना मुख्यमंत्र्यानी त्याचे म्हणणे खोडून का काढले नाही असा सवाल केला. तर प्रतिमा कुतीन्हो यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या वरील गोवेकरांचा विश्र्वास उडाला आहे असे सांगीतले. यावेळी विकास भगत हेही उपस्थीत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT