म्हापसा: गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्या प्रती आजही लोकांच्या हृदयात आदराचे स्थान आहे. त्यामुळे बांदोडकरांच्या कार्याचा गौरव हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याकरिता भाऊसाहेबांचे नाव मोपा येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्या. (Chief Minister Pramod Sawant should name Mopa Airport after Bhausaheb Bandodkar)
ही मागणी भाऊसाहेब बांदोडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा, पेडणे नामकरण समितीचे संघटक सुभाष केरकर यांनी केली. येत्या 15 ऑगस्टला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात घोषणा करावी. मुख्यमंत्री पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकास भेट देतील, त्यावेळी आम्ही त्यांच्यासमोर ही मागणी करणार आहोत. सरकारने ही मागणी फेटाळल्यास आमचे हे आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा केरकर यांनी दिला.
शनिवारी (ता.1३) म्हापशात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी कृष्णा गावकर, प्रशांत शेट, रामदास मोरजे उपस्थित होते. मोपा विमानतळासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. भाऊसाहेब हे बहुजनांचे नेते होते. मुख्यमंत्री सावंत हेही स्वतःला बहुजनांचे नेते म्हणतात. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी पूर्ण करावी, असे आवाहन दीपेश नाईक यांनी केले.
15 ऑगस्टला मुख्यमंत्री पत्रादेवी येथे हुतात्मा स्मारकाला मानवंदना देण्यासाठी येतील, तेव्हा पत्रादेवी चेकपोस्टवर मोठे बॅनर्स लावण्यात येतील. त्यावर ‘भाऊसाहेब बांदोडकर मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वांचे स्वागत आहे’, असे नमूद केलेले असेल, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.
सुदिन ढवळीकरांनी पुढाकार घ्यावा
यावेळी संजय बर्डे म्हणाले की, भाऊसाहेब बांदोडकरांचे गोव्यासाठीचे योगदान फार मोठे असून, ते दूरदृष्टीचे नेते होते. त्यांनीच गोव्यात शिक्षणाचा पाया रचला. त्यांच्यामुळेच गावा-गावांत मराठी शाळा सुरू झाल्या. सध्या भाजप-मगोप युतीचे सरकार असून मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पुढाकार घेत मोपा विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांसमोर लावून धरावी, अशी मागणी त्यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.