CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत केतन भाटीकरांच्या घरी!

दैनिक गोमन्तक

Goa CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनपेक्षितपण आज संध्याकाळी साडेआठच्या सुमारास मगो पक्षाचे डॉ. केतन भाटीकर यांच्या फोंड्यातील निवासस्थानी भेट दिल्यामुळे शहरात राजकीय चर्चांना ऊत आला असून अनेक समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे यावेळी मगो पक्षाचे अनेक कार्यकर्ते तसेच फोंडा नगरपालिकेचे नगरसेवक, कुर्टी - खांडेपार पंचायतीचे पंच सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसमोर अनेकांनी शहरातील समस्या मांडल्या. भाटीकर यांनी फोंड्याच्या उपजिल्हा इस्पितळात आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची कशी गैरसोय होते याची जंत्रीच मांडली.

मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर कुर्टी येथील सरकारी क्रीडा प्रकल्पाची कशी दयनीय अवस्था झाली आहे याचेही भाटीकरांनी विवेचन केले. यावर उपाय म्हणून कुर्टी येथील पशुसंवर्धन खात्याचे मैदान विकसित करून ते मैदान फक्त फुटबॉल खेळाकरता उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी काही क्रीडापटूंकडून करण्यात आली.

क्रीडा प्रकल्पाचे मैदान पूर्णपणे क्रिकेट खेळासाठी वापरले गेल्यास त्याचा फायदा फोंड्यातील क्रिकेटपटूंना होऊ शकेल असाही दावा या क्रीडापटूंनी मुख्यमंत्र्यांकडे केला. मुख्यमंत्र्यांनी यावर विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

फोंडा शहरातील रस्त्यांची दुरवस्था, जागोजागी सुरू असलेली खोदकामे याही बाबी मुख्यमंत्र्यांच्या यावेळी लक्षात आणून देण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी नियोजित बोरी पुलाबाबत बोलताना या पुलामुळे फोंड्याहून मडगाव - वास्कोला जाणे कसे सुटसुटीत होईल यावर प्रकाशझोत टाकला.

बदलत्या राजकारणाची ‘नांदी’

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांचे असे अनपेक्षितरीत्या भाटीकरांच्या निवासस्थानी आगमन झालेले आगमन राजकीय पंडितांना चक्रावून टाकणारे होते. यामुळे ही फोंड्याच्या आगामी बदलत्या राजकारणाची ‘नांदी’ तर नव्हे ना अशी शक्यता सध्या इथे व्यक्त होत आहे. भाटीकर भाजपमध्ये जाऊन फोंड्यातील समीकरणे बदलू शकतात असे जे बोलले जात आहे, त्याला मुख्यमंत्र्यांच्या या ‘भेटी’ने अधिकच पुष्टी मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT