Pramod Sawant With Student Dainik Gomantak
गोवा

Goa Government Schools: गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Chief Minister Pramod Sawant: गेली अनेक वर्षे सरकारी शाळांना गृहित धरून खासगी शाळांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. या प्रकारामुळे सरकारी शाळा बंद पडत होत्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: गेली अनेक वर्षे सरकारी शाळांना गृहित धरून खासगी शाळांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. या प्रकारामुळे सरकारी शाळा बंद पडत होत्या. सरकारी शाळांमधील विद्यार्थी अनुदानित शाळेत पाठविण्याचा ट्रेंड वाढला होता. परंतु मागील ५ वर्षांपासून हा ट्रेंड बदलला असून सरकारने साधनसुविधा तसेच इतर बाबी पुरविण्यात सरकारी शाळांना प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

ते इन्फोसिस स्प्रींगबोर्ड लि. द्वारे विद्यार्थ्यांना स्मार्ट डिवायस टॅबच्या वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी इन्फोसिसचे संतोष अनंतपुरा, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगेडे, गोवा समग्र शिक्षा कार्यक्राचे संचालक डॉ. शंभू घाडी उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ज्यावेळी सरकारी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात साधनसुविधा वाढविल्या आहेत, अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिवायस पुरविले आहेत. त्यानुसार शिक्षकांना सरकारी शाळा कशा विद्यार्थ्यांसाठी चांगल्या आहेत, हे पटवून देत पटसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंफोन्सीसद्वारे जे ऑनलाईन विविध कोर्स शिकविले जाणार आहेत ते विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम उपलब्ध

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅब्लेटचे वाटप केले. हे टॅब्लेट इंग्रजी आणि गणित, विज्ञान तसेच विविध भारतीय भाषांमधील अभ्यासक्रम आहेत. यासोबतच इतर डिजिटल टेक्नॉलॉजी, कॉम्पुटर सायन्स आदी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जे विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी मदत करतील. कंपनी सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत राज्यातील ५० ग्रामीण शाळांमध्ये १५०० टॅब्लेटचे वाटप करण्यात आले असून इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान एक तास ऑनलाईन अभ्यासक्रम शिकण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT