pramod sawant
pramod sawant 
गोवा

Covid 19 Goa: ‘कोविड व्यवस्थापनासाठी 100 कोटी मिळाले नाहीत’

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील (Goa) कोविड (Covid 19) व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार सढळहस्ते आर्थिक मदत करत आहे. या सार्वत्रिक समजातील हवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आज काढून टाकली. केंद्र सरकारने सुरवातीला काही निधी दिला होता त्यानंतर अद्याप कोविड व्यवस्थापनासाठी काहीच आर्थिक मदत केंद्र सरकारकडून मिळालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Chief Minister Pramod Sawant said that Rs 100 crore was not received for the management of Covid 19)

मंत्रालयात आज (बुधवारी) त्यांना केंद्र सरकारकडून कोविड व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेले 100 कोटी रुपये मिळाले का, असे थेटपणे विचारल्यावर त्यांनी सांगितले, कधीही शंभर कोटी रुपये मिळालेले नाहीत. 

केंद्र सरकारने कोविड व्यवस्थापनासाठी भरपूर मदत केली आहे. सुरवातीच्या काळात औषधे, व्हेंटीलेटर केंद्र सरकारने पुरवले. त्यानंतर केंद्र सरकारने इतर राज्यांना तशी मदत केली तशी गोव्यालाही केली. आता केंद्र सरकार कोविड प्रतिबंधात्मक लसी मोफत पुरवत आहे. तोही मोठा आधार या काळात आहे, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT