CM Dr. Pramod Sawant  Dainik gomantak
गोवा

CM Pramod Sawant : खंडणीप्रकरणी चौकशीचे आदेश; मुख्‍यमंत्री गंभीर

राजकीय फायद्यासाठी काही लोकांकडून राज्‍य सरकारची बदनामी!

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यातील उत्तर गोव्यातील रेस्टॉरंट आणि क्लबकडून गोळा केल्या जाणाऱ्या कथित खंडणी प्रकरण दिल्ली दरबारी पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा मुद्दा आता गांभीर्याने घेतला आहे.

या खंडणी प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालक ओमवीर सिंग बिश्‍‍नोई यांना दिले आहेत. त्यामुळे यातील ‘पाडलोस्कर’ आणि ‘तेंडुलकर’ यांच्याशिवाय इतर दोघांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती आहे.

‘काही लोक राजकीय फायदा उठवण्यासाठी वैफल्यग्रस्त होऊन माझ्या सरकारची बदनामी करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी. यातील दोषींवर कडक कारवाई होईल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही.

मग ती व्यक्ती कितीही मोठी आणि कोणाच्याही जवळची असली तरीही! त्याशिवाय या प्रकरणात नक्की कोण आहे ? हे स्पष्ट होणार नाही’, असे मुख्यमंत्री म्हणाले. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरामार येथील स्मृतीस्थळावर आदरांजली अर्पण केल्यानंतर माध्यमांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

दरम्यान, आमदार मायकल लोबो यांनी हॉटेल व्यावसायिकांकडून उकळण्यात येणाऱ्या खंडणीबद्दल आवाज उठविला होता. यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती.

पाडलोस्‍कर, तेंडुलकर व अन्‍य दोघांचा शोध घेतला जाणार; भाजपकडून स्वागत

‘या’ प्रकरणातील पाडलोस्‍कर कोण?

  • कथित खंडणी प्रकरणामुळे दुसऱ्या एका घटनेला उजाळा मिळत आहे. २०१४ मध्ये पाडलोस्कर नामक एका व्‍यक्‍तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा म्हापसा पोलिसांत दाखल झाला होता.

  • त्यावेळी एका तरुणास पोलिस उपनिरीक्षकपदी नोकरी लावतो, असे आमिष दाखवत साडेचार लाख रुपये लुबाडले होते. मात्र, पाडलोस्कर यांनी हे प्रकरण आपण सहमतीने मिटवतो, असे न्यायालयात सांगितले.

  • पैसे परत मिळाल्याने तरुणाने तक्रार मागे घेतली होती. मात्र, सध्याच्या कथित खंडणी प्रकरणामध्ये आलेले नाव नेमके कुणाचे आहे, याबाबत पोलिस

तपास करत आहेत.

खंडणीप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, त्याचे मी स्वागत करतो. या प्रकरणातील ‘तेंडुलकर’ व ‘पाडलोस्कर’ यांना बोलावून त्यांची चौकशी करावी.

त्याचबरोबर व्यावसायिकांनी लिहिलेले पत्र सरकारच्या बदनामीसाठी आहे का? याचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केली आहे.

काय आहे प्रकार?

गत तीन-चार दिवसांपासून कथित खंडणी मागितल्याचे प्रकरण गाजत आहे. उत्तर गोव्यातील किनारपट्टीवरील रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये रात्री 10 नंतर संगीत सुरू असते. निर्बंध असतानाही रात्री उशिरापर्यंत मद्य, जेवण पुरविले जाते, असा आरोप करून हे प्रकार चालू ठेवायचे असतील तर खंडणी द्यावी लागेल, असे सांगत काहींनी रेस्टॉरंट मालकांकडून सरकारच्या नावाने पैसे उकळल्याचा आरोप आहे.

होड्या प्रकरणातही नाव

कथित खंडणी प्रकरणातील ‘पाडलोस्कर’ नावावरून काँग्रेसने एक मुद्दा उपस्थित केला आहे. बंदर कप्तान खात्याने जप्त केलेल्या होड्या काही रक्कम आकारून मूळ मालकाला देण्यात ‘पाडलोस्कर''च्या व्यक्तीचा सहभाग असल्याची माहिती काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी दिली. त्यामुळे दोन्ही प्रकरणातील ‘पाडलोस्कर’ एकच आहे का? हे शोधावे, अशी मागणी त्यांनी केली.

व्यावसायिकांच्या तक्रारी

व्हायरल पत्रावर ज्या आडनावाने सातजणांच्या सह्या आहेत त्यापैकी नाईट क्लब मालक असलेल्या दोघांनी आडनावाशी साम्य असल्याने पोलिसांत विविध तक्रारी दाखल करून त्यांच्या खोट्या सह्या करण्यात आल्याने चौकशीची मागणी केली आहे.

"माझे सरकार स्वच्छ असून, येथे भ्रष्टाचाराला कोणताच थारा नाही. काही लोक वैफल्यग्रस्त होऊन राजकीय फायद्यासाठी खोट्या तक्रारी करून सरकारची नाहक बदनामी करत आहेत. आपण या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले आहेत."

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT