CM Fellowship Goa Dainik Gomantak
गोवा

CM Fellowship Goa: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 20 जागा; तरुणांना शासनाच्या विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी

Goa Government Fellowship: प्रशिक्षण कालावधीत दरमहा १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यातील सुशिक्षित आणि गुणवंत तरुणांना शासनाच्या विविध विकासात्मक उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन, सांख्यिकी व मूल्यमापन संचालनालयाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२६-२७ साठी अर्ज मागविले आहेत. या कार्यक्रमांतर्गत एकूण २० फेलोंची निवड करण्यात येणार असून, राज्याच्या विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये संशोधन, धोरण आखणी, अंमलबजावणी आणि मूल्यमापन प्रक्रियेत त्यांचा सहभाग राहणार आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा उद्देश राज्यातील युवा प्रतिभेला शासन व्यवस्थेशी जोडणे, नव्या कल्पना व तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहित करणे आणि विविध विभागांच्या कामकाजात नावीन्यपूर्ण दृष्टिकोन आणणे हा आहे.

या फेलोशिपअंतर्गत कृषी व संलग्न क्षेत्रे, उद्योग, अक्षय ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, आयुर्वेद, महिला सक्षमीकरण, वित्त, सामाजिक कल्याण, नियोजन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, संगणक विज्ञान तसेच शहरी सुधारणा यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी नियोजन, सांख्यिकी व मूल्यमापन संचालनालयाकडे निर्धारित कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

फेलोशिपचा कालावधी १२ महिन्यांचा!

या कार्यक्रमासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असणे ही अनिवार्य अट आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरवातीला एक महिन्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल.

प्रशिक्षण कालावधीत दरमहा १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या फेलोंना दरमहा ४० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. फेलोशिपचा एकूण कालावधी १२ महिन्यांचा असेल आणि त्यामध्ये प्रशिक्षणाचा कालावधीही समाविष्ट असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chemical Company Blast: भरुचमधील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान अपघात; 5 मृत्यू, 2 गंभीर जखमी

Delhi Capitals Bowling Coach: IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरस्ट्रोक! 761 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती

Kadamba Transport Strike: 'कदंब'च्या ईटीएमविरोधात 12 नोव्हेंबरला संपाचा इशारा; 2 हजारांहून अधिक कर्मचारी उतरणार?

Delhi Mumbai Expressway Accident: खाटूश्यामजींच्या दर्शनाला निघालेल्या प्रवाशांवर काळाचा घाला, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 8 मृत्यू, 10 जखमी

Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT