CM Sawant Joined Karnataka assembly election campaigning  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : म्‍हादईचे पाणी पळविणाऱ्या कर्नाटकसाठी सावंतांचा प्रचार

150 हून अधिक जागा मिळतील, मुख्‍यमंत्र्यांनी व्‍यक्‍त केला विश्वास

दैनिक गोमन्तक डिजिटल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख आता कधीही जाहीर होऊ शकते. त्‍या पार्श्वभूमीवर भाजपने विजय संकल्‍प यात्रा काढली आहे. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दक्षिण कन्‍नड जिल्‍ह्यात कर्नाटकातील भाजप सरकारची स्‍तुती करत 150 हून अधिक जागा मिळतील, असा विश्‍‍वास व्‍यक्‍त केला.

कर्नाटकचे मुख्‍यमंत्री बोम्‍मई यांनी कालच ‘म्‍हादईचे पाणी मलप्रभेत येईपर्यंत गप्‍प बसणार नाही’, असा पुनरुच्‍चार केला असतानाच डॉ. सावंत कर्नाटकात कसा प्रचार करू शकतात, असे म्‍हणत गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी टीका केली आहे.

सरदेसाई म्‍हणतात, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे आपण म्हादईचे पाणी वळविणार, असे ठामपणे सांगतात आणि त्यांनाच निवडून द्या, असे सांगण्यासाठी आमचे मुख्यमंत्री सावंत हे कर्नाटकमध्ये जाऊन प्रचार करतात.

एवढे दुसरे दुर्दैव नाही. कर्नाटकात डबल इंजीन कायम राहावे यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री म्हादईचा बळी देत आहेत. असले घातक मुख्यमंत्री आम्हाला मिळणे हे आमचे दुर्भाग्‍य आहे.

"कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविण्याचा चंग बांधलेला असतानाच म्हादई अभयारण्यात वणवा पेटतो, हा फक्त योगायोग आहे, असे वाटत नाही."

- विजय सरदेसाई, अध्‍यक्ष गोवा फॉरवर्ड

कानडीतून केली सुरुवात

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कानडी भाषेत भाषणाला सुरुवात करत कर्नाटकातील लोकांची मने जिंकली. काँग्रेसवर टीका करत, मोदी सरकारच्‍या कार्याचा त्‍यांनी वेध घेतला.

बंगळुरू-म्‍हैसूर एक्‍स्‍प्रेस-वेचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर होते. त्‍यांच्‍या हस्‍ते दहापदरी बंगळुरू-म्‍हैसूर एक्‍स्‍प्रेस-वेचे लोकार्पण करण्‍यात आले. या प्रकल्‍पासाठी 8,480 कोटी रुपये खर्च करण्‍यात आले. नव्‍या प्रकल्‍पामुळे 3 तासांचे अंतर 75 मिनिटांवर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT