Vijay Sardesai

 

Dainik gomantak

गोवा

भाजप सरकारची 'ही' घोषणा हिंदूंना फसवण्याचा प्रयत्न करतेय

"हिंदूंना एलपीजी, पेट्रोल आणि इतर उत्पादनांवर विशेष सवलत मिळते का?"

दैनिक गोमन्तक

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीला सुरुवात करण्याची घोषणा करून, हिंदूंना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी रविवारी सांगितले. गोवा फॉरवर्डचे सांत आंद्रेचे उमेदवार जगदीश भोबे यांच्या घरोघरी प्रचाराचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

"मुख्यमंत्री अशी विधाने करून लोकांचे लक्ष वळविण्याचे प्रयत्न करीत आहेत, हे लोकांना माहित आहे. बंद असलेला खिनिज व्यवसाय, महिलांची सुरक्षा, पर्यावरणाचा ऱ्हास आणि इतर विषयांवर भाजप (BJP) सरकार उपाय घेण्यास अयशस्वी ठरली आहे. यासाठी लोकांचे लक्ष वळविण्यात येत आहे." असे विजय सरदेसाई (Vijay Sardesai) म्हणाले. "हिंदूंना एलपीजी, पेट्रोल आणि इतर उत्पादनांवर विशेष सवलत मिळते का?" असा सवाल त्यांनी केला.

"कोविड महामारीच्या काळात मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या चुकीच्या कारभारामुळे इतर धर्मीयांचेच नव्हे, तर कोविड बाधित हिंदूंचाही मृत्यू झाला." असेही सरदेसाई यांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील (goa) जनतेला सांगावे की ते खाणकाम पुन्हा सुरू करण्यात का अपयशी ठरले, गोव्यात कोळसा का आणला आणि महिलांना सुरक्षितता देण्यात ते का अपयशी ठरले.

जनतेच्या इच्छेविरुद्ध जाऊन लोकशाहीची हत्या करणाऱ्या सर्व पक्षांतर करणाऱ्यांना लोक धडा शिकवतील, असे सरदेसाई म्हणाले. "या पक्षांतर करणाऱ्यांनी गोव्याच्या कल्याणासाठी नव्हे तर स्वविकासासाठी पक्ष बदलला." असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) भाजपचा पराभव करून त्यांच्या उमेदवारांना घरी पाठवणे हे काँग्रेस (Congress) आणि जीएफपी युतीचे लक्ष आहे.

जगदीश भोबे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, त्यांना लोकांचा खुप चांगला पाठिंबा मिळत आहे. “ सांत आंद्रे मध्ये कोणताही विकास झालेला नाही. अनेक न सुटलेले मुद्दे आहेत, ज्यांचे आम्ही निराकरण करू.” असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hard Decision! विश्वचषक संघातून शुभमन गिलला डच्चू का? कॅप्टन सूर्याने सांगितलं संघ निवडीमागचं 'ते' मुख्य कारण

Sunburn Festival: 'गोव्याशी तुलना करू शकत नाही...' मुंबईतील पहिल्या सनबर्न फेस्टिव्हलबाबत 'EDM' चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव, आर. माधवनचा होतोय जळफळाट? म्हणाला, "तो स्वतःमध्येच..."

Imran khan: इम्रान खानचे पाय आणखी खोलात; पत्नी बुशरा बीबीसह 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

VIDEO: अफलातून कॅच! मार्नस लॅबुशेची हवेत उडी अन् एका हाताने भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT