CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: नेहरूंविषयक मुख्यमंत्र्यांचे विधान वादाच्या भोवऱ्यात

CM Pramod Sawant: पाटकरांनी सुनावले : इतिहासाचा अभ्यास न केल्याची टीका

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: बालदिन व पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जराही संबंध नाही. 14 नोव्हेंबर हा नेहरू यांचा जन्मदिन. त्यांना म्हणे मुले आवडत असत.

म्हणून कॉंग्रेसकाळात 14 नोव्हेंबर हा ‘बालदिन’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. त्यांचा व मुलांचा तसा काडीचाही संबंध नव्हता, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्याच झालेल्या वीरबाल दिवस कार्यक्रमात केलेले विधान वादग्रस्त ठरले आहे.

असे विधान राज्याचे प्रमुख या नात्याने करण्यापूर्वी त्यांनी इतिहास तपासून घ्यायला हवा होता, असे अनेकांचे म्हणणे आहे.

भाजपला कॉंग्रेस आणि नेहरूंची ॲलर्जी असणे समजता येते; पण ‘चाचा चेहरू’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेहरूंच्या मुलांवरील प्रेमाविषयी शंका घेण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही, असेही काहींनी सुनावले आहे.

गोवा राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या पर्वरी येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले होते.

आपल्याला त्यात जायचे नाही, असे सांगत त्यापूर्वीच्या तीन-चार वाक्यांत बालदिन व नेहरू यांची खिल्ली मुख्यमंत्र्यांनी उडवली होती. त्याचे पडसाद बुधवारी उमटले.

मुख्यमंत्र्यांचे सल्लागार त्यांना योग्य ती माहिती देत नसल्याचा शोध संशोधक डॉ. नंदकुमार कामत यांनी लावला आहे. त्यांनी म्हटले आहे, की वीर बाल दिवस साजरा करण्यात काही गैर नाही.

बालदिन का सुरू करण्यात आला याची नोंद इतिहासात आहे ती तपासून घेतली पाहिजे. शिक्षित राज्याच्या मुख्यमंत्र्याने जाहीर भाषणात सत्यच सांगितले पाहिजे.

भाजप राजकीयदृष्ट्या पंडित नेहरू यांच्या वारशाचे दळण करण्यास मोकळा आहे; पण मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने विधान करणे अपेक्षित असते. कामत यांनी यावरून विकीपिडीयात बालदिनाविषयी काय म्हटले आहे, हे नमूद केले आहे.

खोचक सल्ला अन्‌ टोला

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मुख्यमंत्र्यांनी शाळेत असताना इतिहासाचा अभ्यास केला असता तर त्यांनी असे विधान केले नसते, असे उपहासाने ट्विटरवर म्हटले आहे.

सावंत यांना भाजपकडून मिळालेली शिकवण या विधानातून उघडी पडली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

अशी विधाने करण्यात मुख्यमंत्र्यांनी वेळ खर्ची घालण्यापेक्षा शाळांतील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी वेळ द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

SCROLL FOR NEXT