Chhaava Movie Goa Dainik Gomantak
गोवा

Chhaava: 'राष्ट्रप्रेम कसं असावं हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं'; सावर्ड्यात बजरंग दलाकडून 'हाऊसफुल' शोचे आयोजन

Bajrangdal Goa: दक्षिण गोव्यातील सावर्डे येथे मंगळवारी (दि . १८) बजरंग दलाने स्थानिकांसाठी छावा चित्रपट दाखवण्याचा उपक्रम राबवला

Akshata Chhatre

सावर्डे: बहुचर्चित छावा या चित्रपटाची जादू सध्या सगळीकडेच आहे. दक्षिण गोव्यातील सावर्डे येथे मंगळवारी (दि . १८) बजरंग दलाने स्थानिकांसाठी छावा चित्रपट दाखवण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमाला सावर्डे येथून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटानंतर बजरंग दल सावर्डेचे युवा नेता संकेत अर्सेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बजरंग दल सावर्डेचे युवा नेता संकेत अर्सेकर यांनी चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की छत्रपती संभाजी महाराजांनी सोसलेल्या चाळीस दिवसांच्या यातना या चित्रपटात केवळ तीन तासांत मांडण्यात निर्माते यशस्वी झाले आहेत.

छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेलं बलिदान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांना खास करून तरुणांना त्यांनी दिलेल्या असामान्य बलिदानाची आठवण कायम राहावी म्हणून हा सिनेमा प्रत्येकाने बघितलंच पाहिजे. औरंगजेब शेवटपर्यंत महाराजांच्या तोंडून 'हाय' ऐकण्यासाठी वाट बघत राहिला मात्र महाराज त्याच्यासमोर झुकले नाहीत. आजच्या तरुणांनी महाराजांकडून हेच शिकण्याची गरज आहे.

सध्या राष्ट्रगीताला उभं राहायचं म्हटलं तरीही आपण मागे-पुढे पाहतो मात्र राष्ट्रप्रेम कसं असावं हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकण्याची गरज आहे. हे राष्ट्रप्रेम तरुणांना कळावं, समजावं म्हणून खास करून तरुणांना घेऊन या चित्रपटाचा उपक्रम राबवला असं युवा नेता संकेत अर्सेकर म्हणालेत तसंच त्यांनी सर्वांना हा चित्रपट आवर्जून पाहावा अशी विनंती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT