Chhattisgarh Goa Crime 
गोवा

'मुलगा जिंवत हवा असल्यास 20 लाख द्या', सट्टा चालकांनी छत्तीसगडच्या युवकाला गोव्यात ठेवले ओलीस

तरूणाकडून काम फुकटात करून घेण्याबरोबरच त्याचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.

Pramod Yadav

ऑनलाइन सट्टा चालकांनी छत्तीसगड राज्यातील एका तरुणाला गोव्यात ओलीस ठेवले होते. जिवंत पाहायचे असेल तर 20 लाख रुपये द्या, अशी धमकी देत कुटुंबीयांकडून खंडणी मागितली होती. तरुणाच्या वडिलांनी याबाबत दुर्ग पोलिसांत तक्रार केली.

पोलिसांनी तत्काळ एक टीम तयार करून गोव्याला पाठवली. पोलिसांनी तरूण सुयश तामरकर याची सुटका करून, एकाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड दुर्गचा रहिवासी सुयश तामरकर महिनाभरापूर्वी ऑनलाइन सट्टा चालवण्यासाठी गोव्यात गेला होता. दीपक नेपाळी यांच्यामार्फत त्याला गोव्यात पाठविण्यात आले होते.

सट्टा चालवताना नुकसान झाले. त्यानंतर मट्टू नावाच्या आरोपीने त्याला गोव्यातच ओलीस ठेवले. त्याला खोलीतून बाहेर पडू दिले नाही. पॅनलचे काम फुकटात करून घेण्याबरोबरच त्याचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.

सुयशने घरी जाण्याचा हट्ट केल्यावर मट्टूने सुयशच्या वडिलांना फोन करून मुलाला ओलीस ठेवल्याचे सांगितले. तसेच, जिवंत पाहायचे असेल तर 20 लाख रुपये द्या. अशी धमकी देत खंडणीची मागणी केली.

सुयशच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांनी संपर्क केला, एक टीम तयार केली. गोव्यात आलेल्या टीमने मोबाईल लोकेशनच्या आधारे छापा टाकून सुयशची सुखरूप सुटका केली आणि आरोपी मट्टूला अटक केली. पोलिस दोघांनाही ट्रान्झिट रिमांडवर घेतले जाणार आहे.

या कारवाईमुळे गोव्यातील मोठ्या ऑनलाइन सट्टयाचा देखील पर्दाफाश केला आहे.

दीपक नेपाळी याला ऑनलाइन बेटिंग चालवणाऱ्या सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी खंडणीचे काम दिले आहे. दीपक नेपाळी दुर्ग जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या लोकांचे अपहरण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी करतो. दुर्ग पोलीस अनेक महिन्यांपासून दीपक नेपाळीचा शोध घेत होते, मात्र त्याला अटक करण्यात अद्याप यश आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT