Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धारदार शस्त्रानं थेट गळ्यावर वार... मोबोर समुद्रकिनाऱ्यावर छत्तीसगडच्या तरुणाची हत्या, तिघांवर गुन्हा दाखल

देश-विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या गोव्यातील एका प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे.

Sameer Amunekar

पणजी: देश-विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या गोव्यातील एका प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण गोव्यातील मोबोर समुद्रकिनाऱ्यावर (Mobor Beach) छत्तीसगडमधील एका २७ वर्षीय तरुणाची धारधार हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कोलवा पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास चक्रे फिरवून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

'द बाईक हेरिटेज' हॉटेलच्या समोर घडले हत्याकांड

मिळालेल्या माहितीनुसार, ही रक्ताळलेली घटना मोबोर बीचवरील 'द बाईक हेरिटेज' (The Byke Heritage) आणि 'ओल्ड अँकर' रिसॉर्ट परिसराच्या अगदी समोर घडली. शशी लकडा (वय २७, रा. छत्तीसगड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी छत्तीसगडमधील सुरगुजा येथील रहिवासी रोशन राम लकडा यांनी कोलवा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. समुद्रकिनाऱ्यासारख्या सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या हत्याकांडामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हत्याराने थेट गळ्यावर वार; जागीच मृत्यू

फिर्यादी रोशन लकडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी संजय मांझी (वय ३०), आशिष कुमार (वय १८) आणि जगनंदन सिदार (वय २२) यांनी पूर्ववैमनस्यातून किंवा किरकोळ वादातून शशी लकडा याच्यावर हल्ला केला. संशयितांनी शशीच्या गळ्याच्या डाव्या बाजूला हत्याराने गंभीर वार केले. हा वार इतका भीषण होता की, अतिरक्तस्रावामुळे शशीचा मृत्यू झाला.

तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच कोलवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी रोशन राम लकडा यांच्या तक्रारीवरून तिन्ही मुख्य संशयित आरोपींवर हत्येचा (भारतीय न्याय संहितेनुसार) गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण छत्तीसगडचेच राहणारे असून ते गोव्यात कशासाठी आले होते आणि त्यांच्यात नक्की कोणत्या कारणावरून वाद झाला, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT