कळंगुट: आपल्याला स्वराज्य मिळाले आता त्या स्वराज्याचे सुराज्य करायचे आहे. आपले सरकार त्याच मार्गाने कार्यरत असून मंत्रिमंडळातील सर्व आमदार, मंत्र्यांनी त्यासाठी एकजूट होऊन काम करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण सर्वांनी एकजुटीने आणि एकमताने काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
नुकतेच शिवोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, समर्थन संघटनेचे संस्थापक नीलेश वेर्णेकर, समर्थनचे अध्यक्ष प्रेमानंद आरोलकर, उपाध्यक्ष नितीन आगरवाडेकर, सचिव यदुवीर सीमेपुरुषकर, दीपक आगरवाडेकर, विजय कोरगावकर, सरपंच संदेश हडफडकर, पंचसदस्य अमित मोरजकर, मनोरमा गोवेकर, शोभावती चोडणकर, शर्मिला वेर्णेकर, शिवोलीच्या झेडपी सनीशा तोरसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, नीलेश वेर्णेकर आणि आमदार दिलायला लोबो यांनी बावीस फुटी उंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले.
मरणोत्तर गौरव
मूर्तीकार शैलेश खेडेकर यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समर्थन संघटनेचे दिवंगत कार्यकर्ते मुरारी जीवाजी, विनोद वेर्णेकर यांचा मरणोत्तर स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी स्थानिक महिलांचे ढोलताशा वादन तसेच कोल्हापूर-महाराष्ट्र येथील तलवारबाजीने उपस्थितांची मने जिंकली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.