Bandodkar T-20 League Dainik Gomantak
गोवा

Bandodkar T-20 League: बांदोडकर करंडक! चौगुले, पणजी जिमखान्याची विजयी सलामी

चौगुले, पणजी जिमखान्याची अनुक्रमे साळगावकर क्लब, एमसीसी संघावर मात

किशोर पेटकर

Bandodkar T-20 League: यजमान पणजी जिमखाना आणि चौगुले क्लबने बांदोडकर करंडक टी-20 क्रिकेट (Bandodkar T-20 League) स्पर्धेत मंगळवारी विजयी सलामी दिली. सामने कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाले.

यजमान पणजी जिमखान्याने एमसीसी संघावर सहा विकेट राखून विजय प्राप्त केला.

चौगुले क्रिकेट क्लबने समर दुभाषी (नाबाद ७९) व कश्यप बखले (५५) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर साळगावकर क्रिकेट क्लबला आठ विकेट आणि तब्बल पाच षटके राखून सहजपणे हरविले. समर व कश्यप यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक

साळगावकर क्रिकेट क्लब: २० षटकांत ९ बाद १५९ (दीपराज गावकर २५, सुजित नायक नाबाद ६४, मोहित रेडकर २-१९, दिव्यांश ३-२७, स्पर्श जैन १-३९, कृष्णा ठाकूर १-२२, जगदीश पाटील १-१६) पराभूत वि. चौगुले क्रिकेट क्लब: १५ षटकांत २ बाद १६१ (कश्यप बखले ५५, समर दुभाषी नाबाद ७९, दिव्यांश नाबाद १८, अथर्व अंकोलेकर १-१२, अमूल्य पांड्रेकर १-४०).

एमसीसी: २० षटकांत ९ बाद १५४ (दर्शन मिसाळ ६४, दीपक पुनिया ४१, शुभम तारी १-३३, तनय त्यागराजन २-३०, शुभम देसाई ३-२५, अचित शिगवण २-२९) पराभूत वि. पणजी जिमखाना: १९.१ षटकांत ४ बाद १५५ (स्नेहल कवणठकर २७, राजशेखर हरिकांत २६, अझान थोटा ३३, ध्रुमिल मटकर ३७, तुनीष सावकार नाबाद २२, सुमीत कुमार १-३६, हेरंब परब १-२९, दर्शन मिसाळ १-३४, कीथ पिंटो १-१८).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Photo Contest: गोव्यातील नदी, डोंगर, निसर्गसौंदर्याचा फोटो काढा आणि 20 हजार रुपये जिंका; कसा घ्यायचा सहभाग, वाचा सविस्तर

Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

Sawantwadi Gambling Raid: सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर सावंतवाडीतील 4 मटका-जुगार अड्ड्यांवर धाड; 8 जणांवर कारवाई

Nepal President Resigned: पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यानंतर राम चंद्र पौडेल यांनी दिला राष्ट्रपती पदाचा राजीनामा; नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप!

SCROLL FOR NEXT