300 five star hotels fraud case Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: चार्ल्स शोभराजचा ‘चेला’ अखेर गजाआड! 35 वर्षांत 300 पंचतारांकित हॉटेल्‍सना गंडा; गोव्यातही राहून गेला महाठग

bingson john conman arrested raipur: तब्‍बल साडेतीन दशके देशभरातील ३०० हून अधिक पंचतारांकित हॉटेलांची फसवणूक करणाऱ्या आणि कुप्रसिद्ध गुन्हेगार चार्ल्स शोभराजच्या गुन्हेगारी शैलीने प्रेरित झालेल्या ६९ वर्षीय बिंग्सन जॉन याला रायपूर पोलिसांनी अटक केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: तब्‍बल साडेतीन दशके देशभरातील ३०० हून अधिक पंचतारांकित हॉटेलांची फसवणूक करणाऱ्या आणि कुप्रसिद्ध गुन्हेगार चार्ल्स शोभराजच्या गुन्हेगारी शैलीने प्रेरित झालेल्या ६९ वर्षीय बिंग्सन जॉन याला रायपूर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या महाठगाने गोव्यातील पंचतारांकित हॉटेलांमध्येही मुक्काम करून त्याच पद्धतीने फसवणुकीचे (Fraud) प्रकार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

मूळचा तामिळनाडूचा असलेला जॉन गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बनावट ओळखपत्रांच्या आधारे पंचतारांकित हॉटेलांमध्ये राहायचा. स्वतःला कधी परदेशी पर्यटकांचा गाईड, कधी इंग्रजीचा प्राध्यापक, तर कधी योग प्रशिक्षक म्हणून सादर करून तो हॉटेल कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर हॉटेलचे बिल न भरता पसार होणे, तसेच संधी मिळाल्यास मौल्यवान वस्तू घेऊन जाणे, अशी त्याची कार्यपद्धती होती.

अलीकडेच रायपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन दिवस मुक्काम केल्यानंतर जॉन याने सुमारे ६३ हजार रुपयांचे बिल न भरता हॉटेलचा सुमारे १.४८ लाख रुपयांचा लॅपटॉप घेऊन पलायन केले. तांत्रिक तपासाच्या आधारे रायपूर पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत भुवनेश्वर येथून त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे.

चौकशीत जॉनने १९९६ मध्ये दिल्लीतील तिहार कारागृहात शिक्षा भोगत असताना चार्ल्स शोभराजच्या संपर्कात आल्याचे सांगितले. त्यानंतर बनावट ओळखपत्रे, खोटी ओळख आणि रूप बदलण्याच्या पद्धती त्याने आत्मसात केल्याची कबुली दिली आहे. रायपूर पोलिस आता त्याने गोव्यासह विविध राज्यांत केलेल्या गुन्ह्यांची माहिती गोळा करत आहेत.

गोव्‍यातील घटनांचा तपास सुरू

चौकशीवेळी जॉनने गोव्यातील पंचतारांकित हॉटेलांमध्येही अनेकदा मुक्काम केल्याचे सांगितले आहे. त्‍यामुळे याबाबची माहिती संबंधित राज्यांच्या पोलिसांकडून मागविण्यात येत असून, जुन्या गुन्ह्यांची पडताळणी सुरू आहे.

अशी होती ‘मोडस ऑपरेंडी’

बनावट ओळखपत्रांच्या आधारे हॉटेलमध्ये प्रवेश

स्वतःला गाईड, प्राध्यापक किंवा योग प्रशिक्षक म्हणून सादर करणे

इंग्रजीतील प्रभावी संवादातून कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकणे

ॲडव्हान्स न भरता हॉटेलमध्‍ये मुक्काम करणे.

बिल न भरता पसार होणे; संधी मिळाल्यास मौल्यवान वस्तू घेऊन जाणे.

उच्चशिक्षित राहणीमानामुळे हॉटेल कर्मचारी त्याच्यावर भुलून जात आणि त्याच्याकडे ॲडव्हान्स रक्कम मागत नसत

चार्ल्स शोभराजकडून तुरुंगात घेतले ‘धडे’

१९९६ मध्ये तिहार कारागृहात असताना बिंग्सनची चार्ल्स शोभराजशी ओळख झाली. चौकशीत त्याने शोभराजच्या फसवणुकीच्या पद्धतींनी आपण प्रभावित झाल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर देशभरातील आलिशान हॉटेलांना लक्ष्य करून त्याने तब्‍बल ३५ वर्षे फसवणुकीचा हा सिलसिला सुरू ठेवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT