Solar Ferry Service in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Ferry Boat: सौर-इलेक्ट्रिक फेरीबोटीच्या चार्जिंग स्टेशनचा पत्ताच नाही

सौर-इलेक्ट्रिक फेरीबोटीचा मुक्काम दिवाडीला; सेवा सुरू होण्यास नोव्हेंबर महिना उजाडणार

दैनिक गोमन्तक

पणजी: सौर-इलेक्ट्रिक हायब्रीड फेरीबोटीचे लोकार्पण गुरुवारी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते झाले खरे. परंतु पणजी-चोडण या मार्गावर चालणाऱ्या या फेरीसेवेला प्रत्यक्षात नोव्हेंबर महिना उजाडावा लागेल. कारण चोडण येथे फ्लोटिंग जेटीचे स्थान, शिवाय दोन्ही जेटींजवळ चार्जिंग स्टेशन उभारणे आवश्‍यक आहे. त्यानंतरच ही सेवा सुरू होऊ शकते. सध्या ही बोट दिवाडीला हलवली आहे.

(charging station of solar-electric ferry has no address )

या फेरीबोटीचे लोकार्पण झाल्यानंतर 15 दिवस मोफत सेवा देणार असल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात सेवा कधी सुरू होणार, हे निश्‍चित केलेले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोडणच्या बाजूला तरंगती जेटी उभारायची म्हटल्यास नदी परिवहन खात्याला तेथील पंचायतीला व लोकांना विश्‍वासात घ्यावे लागणार आहे. त्याचबरोबर जेटीपासून काही अंतरावर चार्जिंग स्टेशनची निर्मितीही करावी लागणार आहे. अशाच प्रकारचे चार्जिंग स्टेशन पणजीतील जेटीजवळ करावे लागणार आहे.

सौर-इलेक्ट्रिक फेरीबोटीचा मुक्काम दिवाडीला

नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई या फेरीबोटीच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमावरून नाराज होते. परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांची नाराजी दूर केल्याने ते कार्यक्रमास उपस्थित राहिले. परंतु बंदर कप्तान खात्याने ही सेवा सुरू करण्याविषयी किंवा फेरीबोटीच्या सुविधेविषयी मंत्री फळदेसाई यांच्याशी काहीच चर्चा केली नाही, याचा राग त्यांच्या मनात आहे. आता लोकार्पण झाले असले तरी सेवा कधी सुरू होणार, हे अद्याप निश्‍चित झालेले नाही.

कर्मचाऱ्यांची उणीव

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील फेरीबोट सेवेत अगोदरच कमी कर्मचारी आहेत. त्यात या फेरीबोटीसाठी किमान आठ कर्मचारी लागणार आहेत. पहिल्या सत्रात चार आणि दुपारच्या सत्रात चार असे आठ कर्मचारी बोटीवर ठेवावे लागतील. त्याशिवाय त्यांना ही बोट चालविण्यासाठी प्रशिक्षणही द्यावे लागणार आहे. त्यामुळे अगोदरच फेरीबोट सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांद्वारे जर ही बोट चालवायची झाल्यास कर्मचाऱ्यांची उणीव भासणार, हे निश्‍चित.

उपयुक्ततेवर प्रश्‍नचिन्ह

रायबंदर ते चोडण मार्गावर सर्वाधिक पाच फेरीबोटी चालतात. दुचाकी आणि बसने प्रवास करणाऱ्यांना ही सेवा मोफत आहे. आता नदी परिवहन खात्याने या मार्गावर सौर-इलेक्ट्रिक हायब्रीड फेरीबोट सुरू करण्याचे ठरविले आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर या मार्गाचा किती लोक वापर करतात, हेही पाहावे लागेल.

दरपत्रक उपलब्ध नाही

या फेरीसेवेचे दरपत्रक ठरविणे आवश्‍यक आहे. ते दर आधी अधिसूचित करावे लागणार आहेत. वाहनांना या फेरीबोटीत स्थान नाही. परंतु या सेवेचा दर 25 ते 30 रुपये ठेवला तर लोक वापर करतील का? हा प्रश्‍न अनुत्तरितच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT