Changes in Traffic Routes Dainik Gomantak
गोवा

Changes in Traffic Routes : पणजीत शनिवारी वाहतूक मार्गात बदल; कार्निव्हल, योगशिबिरामुळे प्रशासनाचा निर्णय

प्रसंगी बंद रस्ते होणार खुले

दैनिक गोमन्तक

Panjim Changes in Traffic Routes: पणजीत येत्या 18 फेब्रुवारीला पणजी शहरातून होणारी कार्निव्हल मिरवणूक तसेच मिरामार येथे रामदेवबाबांचे योग शिबिर व त्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. या दोन्ही कार्यक्रमावेळी वाहतुकीचा मार्ग व पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

या दोन्ही कार्यक्रमादरम्यान पणजी शहरात वाहतुकीच्या कोंडीची शक्यता आहे, मात्र ती सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस प्रयत्नशील असतील. प्रसंगी शहरातील बंद असलेले व अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी त्या दिवशी खुले करण्यात येतील, अशी माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी दिली. (Goa Carnival 2023)

कार्निव्हलच्या पार्श्‍वभूमीवर मिरामार येथील येथून पणजीबाहेर जाणारी वाहने मिरामार - कांपाल रस्त्यावरून पुढे जाऊन गणेश मंदिर येथे वळसा घेतील. त्यानंतर ती अग्निशमन दलाच्या कार्यालयाकडून सांतिनेझ येथून 18 जून रस्त्यापर्यंत चर्च चौकातून पुढे जातील.

त्यानंतर ती जुन्या पाटो पुलावरून पणजी बसस्थानकाकडे जातील. वाहन चालक चर्चचौकाजवळ उजव्या बाजूने वळून जुन्या पाटो पुलाकडे किंवा मळा येथेही या मार्गाने जाऊ शकतील. रुअ द ओरेम येथून येणारी वाहने हॉटेल सोना येथे पोहचल्यावर त्यांना डाव्या बाजूला जाता येणार नाही.

कार्निव्हल परेड या मार्गावरून!

कार्निव्हल मिरवणूक संध्याकाळी 4 वा. रायबंदर रस्ता येथील नव्या पाटो पुलावरून पणजी शहरात प्रवेश करणार आहे व ही मिरवणूक कांपाल येथे बांदोडकर रस्त्यावरून पुढे जाईल. या दरम्यान, शहरातील वाहतूक मार्गात दुपारी 2 वाजल्यापासून बदल करण्यात आला आहे.

पणजीत प्रवेश करणारी वाहने नेहमीप्रमाणे नव्या पाटो पुलावरून पुढे जातील. बांबोळी येथून येणाऱ्या वाहनांना मळा पुलावरून फोर पिलार जंक्शन येथून भाटलेमार्गे वळवण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT