Chandrakant Shetye | ITI Bicholim Dainik Gomantak
गोवा

Chandrakant Shetye: 'सरकारी नोकरीच्यामागे लागू नका', आमदार शेट्येंचा तरुणांना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला

Bicholim 'ITI' Skill Convocation Ceremony: डिचोली औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या (आयटीआय) कौशल्य दीक्षांत सोहळ्यात डॉ. शेट्ये प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. येथील दीनदयाळ सभागृहात आयोजित या शानदार सोहळ्याप्रसंगी खास पाहूणे म्हणून सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक रघुवीर च्यारी नाचनोळकर उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Chandrakant Shetye Inspires ITI Bicholim Students to Think Beyond Government Jobs

डिचोली: केवळ सरकारी नोकरीच्या मागे लागू नका. आज अनेक पर्याय आणि संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचा फायदा घेत युवकांनी आत्मनिर्भर बनून स्वतःचे भवितव्य घडवावे, असे मत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्यक्त केले. पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्याबाबत चिंता आणि दडपण असते. तेव्हा युवा पिढीने वाईट गोष्टीपासून लांब रहावे, असे आवाहनही डॉ. शेट्ये यांनी केले.

डिचोली औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या (आयटीआय) कौशल्य दीक्षांत सोहळ्यात डॉ. शेट्ये प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. येथील दीनदयाळ सभागृहात शनिवारी (ता. २६) आयोजित या शानदार सोहळ्याप्रसंगी खास पाहूणे म्हणून सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक रघुवीर च्यारी नाचनोळकर उपस्थित होते. अन्य मान्यवरात जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, ''आयटीआय''चे प्राचार्य कपिल आयगल, ''जीकेबी''चे वरिष्ठ व्यवस्थापक सेड्रिक लोबो यांचा समावेश होता.

या सोहळ्यात वेगवेगळ्या व्यावसायिक ट्रेडमधून तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. रघुवीर नाचनोळकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सरकारच्या योजनांचा लाभ घेत स्वयंरोजगार सुरु करावा, असे आवाहन प्रशिक्षणार्थीना केले.

सुरवातीस प्रशिक्षणार्थीनी स्वागतगीत आणि लोकनृत्य सादर केले. प्राचार्य आयगल यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षक पुष्पराज मांद्रेकर यांनी अहवाल सादर केला. डायना डिसोझा यांनी सूत्रसंचालन केले. संजू नाईक यांनी आभार मानले. या सोहळ्यास प्रशिक्षणार्थीचे पालक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझे घर' योजनेचा लाभ घ्या; मुख्यमंत्री सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन, 1972 पूर्वीची घरे नियमित होणार

Amba Ghat Landslide: कोकणात मुसळधार पावसाचा तडाखा, आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

America Accident: अमेरिकेत भीषण अपघात! यू-टर्न घेणाऱ्या ट्रकला धडकली कार, तिघांचा जागीच मृत्यू; भारतीय चालकावर हत्त्येचा आरोप VIDEO

44, 35 ते 30 लाख गोव्यात कोणत्या मंत्र्याकडे महागडी कार? कोण वापरतंय सर्वात स्वस्त गाडी Video

Asia Cup 2025: IND vs PAK मॅच होणार नाही! आशिया कपमधून पाकिस्तान 'आऊट', आता 'या' देशाच्या संघाला मिळणार संधी

SCROLL FOR NEXT