Margao Dainik Gomantak
गोवा

Margao: पर्वतावरील पाषाणी दगडांची तोडफोड, संयुक्त समितीकडून पाहणी; सौंदर्यीकरण करताना नुकसान

chandreshwar bhoothnath temple: पारोडा, केपे येथील चंद्रेश्वर पर्वतावर असलेल्या चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर परिसरात सौंदर्यीकरणाच्या नावाखाली कंत्राटदाराने जी तोडफोड केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: पारोडा, केपे येथील चंद्रेश्वर पर्वतावर असलेल्या चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर परिसरात सौंदर्यीकरणाच्या नावाखाली कंत्राटदाराने जी तोडफोड केली आहे, त्यासंदर्भात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी संयुक्त समितीने या परिसराची पाहणी केली.

याप्रकरणी शेल्डे, केपे येथील पर्यावरण कार्यकर्ते आदित्य देसाई यांनी रिट याचिका दाखल केली होती. त्यांच्याच उपस्थितीत झालेल्या या पाहणीवेळी पुरातत्त्व खात्याचे संचालक नीलेश फळदेसाई तसेच गोवा पर्यटन विकास महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. हे सौंदर्यीकरणाचे काम पर्यटन विकास महामंडळातर्फे केलेजात आहे.

यावेळी केलेल्या पाहणीत हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने जुने पाषाणी दगड फोडून टाकले असून काही जुने दगड विस्‍कळीत करून टाकल्‍याचे दिसून आले. ही जागा पुरातत्त्व कायद्याच्‍या खाली संरक्षित करण्‍यात आली असून हे काम करताना जुने अवशेष फोडून टाकल्‍याचे दिसून आले.

या पाहणीनंतर याचिकाकर्ते आदित्‍य देसाई यांनी प्रसार माध्‍यमांशी बोलताना, हे मंदिर पुरातन असून या ठिकाणी अनेक प्राचीन शिल्‍पे होती. मात्र सौंदर्यीकरण करताना त्‍या शिल्‍पांचे नुकसान झाले. काही ठिकाणी डोंगर कृत्रिमरीत्या कापण्‍यात आला. हे न्‍यायालयाच्‍या लक्षात आणून दिल्‍यानंतर त्‍याची खातरजमा केल्‍यानंतरच ही संयुक्‍त पाहणी करण्‍यात आली होती, असे सांगितले.

अहवाल न्यायालयाला सादर करणार

ही समिती आपल्‍या अहवाल उच्‍च न्‍यायालयाला सादर करणार असून यासंबंधी १० नोव्‍हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. यासंदर्भात देसाई यांनी यापूर्वी पर्यटन विकास महामंडळाकडेही तक्रार केली होती. या तक्रारीत तथ्‍य आढळल्‍याने पर्यटन विकास महामंडळानेही कंत्राटदाराला काम बंद करण्‍याचा आदेश दिला होता. अनधिकृतरीत्या खोदकाम करणे, डोंगर कापणे आणि स्‍फोटके वापरून खडक फोडणे अशा आशयाची ही तक्रार होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Inspirational Story: पुत्र व्हावा ऐसा... मुलाने आई - बाबांसाठी अमेरिकेत खरेदी केले आलिशान घर, कार; US दर्शनही घडवले Watch Video

Diwali Muhurat: गोव्यात धाकटी दिवाळी कधी? प्रदोष काळ ठरू शकतो मोठा 'अडथळा' तारखांचा गोंधळ संपवा; अचूक मुहूर्त वाचा

Goa Live Updates: चंद्रेश्‍वर-भूतनाथ संस्‍थानात सोमवारी पालखी उत्‍सव

Jasprit Bumah Angry: "मी तुम्हाला बोलवलं नाहीय..." मैदानात साधा दिसणारा 'जस्सी' पापाराझींवर का चिडला? पाहा Viral Video

Rain In Goa: दिवाळीच्या पहिल्या आंघोळीपर्यंत पडणार पाऊस; गोव्यात पाच दिवस यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT