Goa Live Updates: रेल्वेच्या धडकेने करमळीत एक ठार

Goa Live News Blog 16 October 2025: राजकारण, पर्यटन, गुन्हे, अपघात, कला - क्रीडा - संस्कृती, दिवाळी, पर्पल फेस्ट यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी.
Goa Live Updates
Goa Live UpdatesDainik Gomantak

Railway Accident: रेल्वेच्या धडकेने करमळीत एक ठार

रेल्वेच्या धडकेने एक अज्ञात व्यक्ती ठार झाला. करमळी  रेल्वे  स्टेशननजीक ही  घटना घडली. मृत व्यक्ती  अंदाजे ३० ते ३५  वयोगटातील असून, अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोकण रेल्वे पोलिसांनी ही घटना नोंदवून घेतली आहे. मृतदेह गोमेकॉच्या  शवागारात ठेवला आहे. उपनिरीक्षक व्ही. वस्त पुढील तपास करीत आहेत.

Shiroda: शिरोडा येथे रविवारी आकाशकंदील स्पर्धा

शिरोडा येथील कलासागर सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, १९ रोजी शिरोडा गावापुरती मर्यादित आकाशकंदील स्पर्धा आयोजित केली आहे. येथील बँक ऑफ इंडियासमोर सायंकाळी ६ वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. माहितीसाठी नीलेश शिरोडकर यांच्याशी संपर्क साधावा.

Margaon: मडगावात फ्लॅटला आग लागून हानी

आके येथे एका फ्लॅटला मंगळवारी रात्री आग लागून एक लाख रुपयांची हानी झाली. मडगाव अग्निशमन दलाने नंतर घटनास्थळी जाऊन आग विझविताना वीस लाखांची मालमत्ता वाचविली. समीर देविदास यांच्या मालकीचा हा फ्लॅट आकार हॅबिटेट या इमारतीत पहिल्या मजल्यावर आहे. रात्री पावणे बाराच्या दरम्यान आगीची वरील घटना घडली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला.

Curtorim: कुडतरी चोरीप्रकरणी दोघांना अटक

दहा महिन्यांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणाचा मायणा कुडतरी पोलिसांनी छडा लावताना दोघांना अटक केली. अंजारुल हक्क (२०, बिहार) व विमल सिंग (२९, दिल्ली) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत. १८ जानेवारी रोजी संशयितांनी नेक्सा शोरूममध्ये चोरी करून तिजोरी फोडून ९० हजार पळविले होते. या घटनेनंतर ते फरार झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com