Chandrakant Keni Journalism Award to Senior Journalist Pramod Prabhugaonkar Dainik Gomantak
गोवा

ज्‍येष्‍ठ पत्रकार प्रमोद प्रभुगावकर यांना चंद्रकांत केणी पत्रकारिता पुरस्‍कार

26 नोव्‍हेंबर रोजी स्‍व. केणी यांच्‍या जयंतीदिनी पुरस्‍कार वितरण समारंभ

सुशांत कुंकळयेकर

Chandrakant Keni Journalism Award to Senior Journalist Pramod Prabhugaokar

मागची 48 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले ज्‍येष्‍ठ पत्रकार प्रमोद प्रभुगावकर यांना यंदाचा स्‍व. चंद्रकांत केणी यांच्‍या नावे दिला जाणारा पत्रकारिता पुरस्‍कार जाहीर करण्‍यात आला आहे. 26 नोव्‍हेंबर रोजी स्‍व. केणी यांच्‍या जयंतीनिमित्त मडगावात आयाेजीत केल्‍या जाणार्‍या एका जाहीर समारंभात त्‍यांना हा पुरस्‍कार देण्‍यात येणार आहे.

स्‍व. केणी यांनी आपली पत्रकारिता ‘गोवा आणि गोव्‍याची अस्‍मिता’ हे दोन केंद्रबिंदू आपल्‍या डोळ्‍यासमोर ठेवून केली. गोव्‍याची प्रगती आणि गोवेकरांचा उत्‍कर्ष या दोन उद्दिष्‍टांसाठी त्‍यांनी आपल्‍या पत्रकारितेचा सकारात्‍मक उपयोग केला.

केणी यांची हीच विचारसरणी पुढे नेणार्‍या गोमंतकीय पत्रकाराला स्‍व. केणी यांची अाठवण म्‍हणून हा पुरस्‍कार दिला जातो. यापूर्वी ज्‍येष्‍ठ पत्रकार सुरेश वाळवे आणि उदय भेंब्रे यांना हा पुरस्‍कार देण्‍यात आला होता.

प्रमोद प्रभूगावकर हे ज्‍येष्‍ठ पत्रकार असून १९७५ पासून त्‍यांनी दै. राष्‍ट्रमतमध्‍ये काम केले. संपादकीय विभागात काम करणारे एक उत्‍कृष्‍ट पत्रकार म्‍हणून प्रसिद्धी मिळविलेल्‍या प्रभुगावकर यांनी दै. सुनापरान्‍त, दै. गोवा दूत, दै. लोकमत आणि दै. गोमन्‍तकमध्‍येही काम केले असून संपादकीय विभागाचा सर्व कामाचा त्‍यांना गाढा अनुभव अाहे. यापूर्वी १८ जून ट्रस्‍ट, गूज पत्रकार संघटना, गोवा मराठी पत्रकार संघ, काणकोण पत्रकार संघ आणि मडगाव लायन्‍स क्‍लब यांच्‍याकडून त्‍यांचा सत्‍कार झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

SCROLL FOR NEXT