Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Chandor Panchayat: वारसा स्थळात चांदर पंचायत आदर्श ठरेल: युरी आलेमाव

कृती आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञांची बैठक संपन्न

Kavya Powar

चांदर-कावोरी पंचायतीच्या ग्रामविकास समितीने आपल्या सुंदर चांदरला ‘वारसा स्थळ’ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून कृती आराखडा तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे हे कौतुकास्पद आहे.

चांदर-कावोरी पंचायत ही चांदरला ‘वारसा स्थळ’ म्हणून विकसित करणारी गोव्यातील एक आदर्श पंचायत ठरेल, असे उद्‍गार कुंकळ्ळीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काढले.

चांदर-कावोरी पंचायतीच्या ग्रामविकास समितीने चांदरला वारसा स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.

यावेळी वास्तुविशारद डीन डिक्रूझ व हेता पंडित, इतिहास संशोधक प्रजल साखरदांडे, माजी व विद्यमान पंचायत सदस्य व चांदरच्या रहिवाशांनी या चर्चासत्रात सहभागी होऊन मौल्यवान सूचना केल्या व विविध कल्पनाही मांडल्या.

आजचा हा परिसंवाद पंचायत राजच्या निकषांना अनुसरून आहे. आपल्या गावचे प्राथमिक भागधारक म्हणून गावकऱ्यांनीच गावात काय करावे आणि काय करू नये हे ठरवावे. वारसा स्थळ विकास आराखडा तयार करण्यास सुरवात केल्याबद्दल मी ग्रामविकास समितीचे कौतुक करतो, असे युरी आलेमाव म्हणाले.

तरुण आणि स्थानिकांसाठी रोजगार व व्यवसायाची संधी निर्माण करण्यासाठी वारसा स्थळाचा आराखडा तयार करताना विचार झाला पाहिजे. शाश्वत आर्थिक उत्पन्न देणाऱ्या रोजगार संधी तयार झाल्या पाहिजेत. वारसा स्थळाचे सर्व नियम पाळूनच पुढे जाणे गरजेचे आहे.

त्यामुळेच गावचे वारसा महत्त्व जतन करता येईल, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले. ग्रामपंचायतीने आराखडा तयार केल्यानंतर सरकारकडे त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT