Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: रस्त्यावर अडवून बेदम मारहाण, 12 लाखांचे दागिने - मोबाईल पळवला; जखमी 'अंकल'च्या पार्श्वभूमीमुळे वाढली गुंतागुंत

Chandor Assault Case: इगर्जेभाट-चांदर येथे मारहाण प्रकरणातीत जखमी निकलाव डिकॉस्‍टा ऊर्फ अंकल (७५) हा सध्या उत्तर गोव्यातील आश्‍‍वे-मांद्रे येथे आहे. मारहाणप्रकरणी पोलिसांनी त्याची जबानी नोंदवून घेतली आहे.

Sameer Panditrao

मडगाव: इगर्जेभाट-चांदर येथे मारहाण प्रकरणातीत जखमी निकलाव डिकॉस्‍टा ऊर्फ अंकल (७५) हा सध्या उत्तर गोव्यातील आश्‍‍वे-मांद्रे येथे आहे. मारहाणप्रकरणी पोलिसांनी त्याची जबानी नोंदवून घेतली आहे. मात्र तो व्यवस्थित माहिती देत नसल्याने या मारहाण प्रकरणाचा गुंता कायम आहे. दरम्‍यान, निकलाव डिकॉस्‍टा याचीही पार्श्वभूमी गुन्‍हेगारी स्‍वरूपाची असल्‍याने गुंता वाढत चालला आहे.

पोलिससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकलाव याची मुलगी आश्‍‍वे-मांद्रे येथे राहते. पोलिसांना दिलेल्या जबानीत तो समाधानकारक उत्तरे देत नाही. त्यामुळे या मारहाणीमागील निश्‍चित कारण काय हे अद्याप समजू शकले नाही. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनल गावकर पुढील तपास करत आहेत. भारतीय न्यायदंड संहितेच्या ३०९ (२) कलमाखाली मायणा-कुडतरी पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.

जखमी झाल्यानंतर सुरवातीला निकलाव डिकॉस्‍टा याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्‍यात आले होते. मागाहून त्याच्यावर मडगावच्या एका खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. तेथून डिस्चार्ज मिळाल्‍यावर तो उत्तर गोव्यात उपचार घेत आहेत. या मारहाण प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेतली आहे. संशयितांच्या शोधासाठी राज्यातील सर्व पोलिस स्‍थानकांत बिनतारी संदेश पाठवून देण्यात आले आहेत.

वेश्‍‍या व्‍यवसायप्रकरणी झाली होती अटक

जखमी निकलाव डिकॉस्‍टा याचीही पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. २०२२ साली वेश्या व्यवसाय प्रकरणात त्याला वेर्णा पोलिसांनी अटक केली होती. अशाच प्रकारचे अनेक गुन्हे त्याच्या नावावर नोंद असल्याची माहिती पोलिससूत्रांनी दिली. त्याला झालेली मारहाण प्रकरण हे गुंतागुंतीचे बनले आहे. त्‍यामुळे तपासकामाविषयी पोलिसांनी गोपनियता बाळगली आहे. सध्या निकलाव हा पोलिसांनाच योग्‍य माहिती देत नसल्याने पुढील तपासही खुंटला आहे.

४ सोनसाखळ्‍या, ५ अंगठ्या, १ ब्रेसलेट, महागडा मोबाईल, रोख रक्कम लंपास

रविवारी २० जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास निकलाव यांना मारहाण करून संशयितांनी त्यांच्याकडील १२ लाख रुपये किमतीचे सुवर्णलंकार पळवून पोबारा केला होता. दोन ते तीन युवकांनी निकलाव यांना घराबाहेर अडविले व बेदम मारहाण केली होती. संशयित युवक हे २५ ते ३५ वर्षे वयोगटातील होते. निकलाव यांच्याकडील चार सोनसाखळ्‍या, पाच अंगठ्या, एक ब्रेसलेट, ३० हजार रुपये व एक लाख रुपये किमतीचा एक मोबाईल संशयितांनी पळवून नेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT