Monsoon Update
Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

गोव्यासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, 'या' चार जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट

दैनिक गोमन्तक

देशाच्या अनेक भागात मान्सून सक्रिय झाला. अनेक भागात मेघगर्जनेसह जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, पुढील पाच दिवस मध्य भारत, पश्चिम किनारपट्टी आणि वायव्य भारतात सक्रिय मान्सूनची स्थिती राहील. IMD ने आपल्या हवामान बुलेटिनमध्ये पुढील काही दिवसांत गुजरात, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Chance of torrential rains in Maharashtra including Goa, red alert of rains in four districts)

पुढील 5 दिवसात गुजरात, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा, किनारी कर्नाटक, केरळ आणि माहे, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या भागात रेड अलर्ट आहे?

भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची अवस्था बिकट झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अतिवृष्टी आणि पुराबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत. एनडीआरएफची टीम कोकणात तैनात करण्यात आली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड वेदर अलर्ट जारी करण्यात आले. रायगड, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कुठे आहे ऑरेंज अलर्ट?

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टसोबतच ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. पालघर, ठाणे, नाशिक, पुणे आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे आणि नाशिकच्या घाटात येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तण्यात आली आहे. त्याचवेळी पंचगंगा नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. एनडीआरएफची टीम येथे तैनात करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

गुजरातमध्येही मुसळधार पाऊस

पुढील काही दिवस गुजरातमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, गुजरातमध्ये 6 ते 9 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो. 5 ते 8 जुलैला सौराष्ट्र आणि कच्छमध्ये आणि 9 जुलै रोजी मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरातमधील नवसारी, सुरत, वलसाडमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोरबंदर, जुनागड, गिर, सोमनाथ, भरूच आणि सुरतमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कर्नाटक आणि मध्य प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे

याशिवाय 5 ते 6 जुलै दरम्यान कर्नाटकच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळमध्येही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशात पावसाची शक्यता लक्षात घेता केशरी आणि पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. जवळपास 15 जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. यासोबतच छत्तीसगडमध्ये 7 ते 8 जुलै आणि ओडिशामध्ये 5 ते 9 जुलै दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेलंगणात 8 आणि 9 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT