Chance of rain in various parts of the state today and tomorrow Dainik Gomantak
गोवा

राज्यात आज, उद्या विविध भागात पावसाची शक्यता

पुढील 48 तासांत राज्यातील तापमान 2 अंश डिग्री सेल्सिअसने वाढणार

दैनिक गोमन्तक

देशासह राज्यात सूर्य आग ओकताना दिसत आहे. सर्वत्र वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रचंड उन्हामुळे उष्णता वाढत आहे. डाॅक्टरांनी देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अशातच पुढील 48 तासांत राज्यातील तापमान (Temperature) 2 अंश डिग्री सेल्सिअसने वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच आज, उद्या विविध भागांत पावसाचीही (rain) शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

दरम्यान काल मोरजी भागात पावसाने हजेरी लावली होती. पावसाने झोडपले अन् आभाळच फाटले तर शेतकऱ्यांनी न्याय मागावा तरी कुणाकडे , अशी अवस्था हिदुस इब्रामपूर येथील शेतकऱ्यांची झाली आहे. अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे आल्या मुळे प्राण गावस आणि इतर शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने,लाखो रुपयांची हानी सोसावी लागली आहे. चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे वाहिल्यामुळे हे संकट ओढवले आहे. चार दिवस उलटले तरी आजपर्यंत कृषी (agriculture) विभागाने किंवा अधिकाऱ्यांनी पाहणी न केल्याने शेतकरी नाराज बनले आहेत.

एका बाजूने सरकार शेती व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी विविध योजना राबवत आहेत, तर दुसऱ्या बाजूने उभीच्या उभी शेती उपद्रवी वन्यप्राणी उद्‍ध्वस्त करत आहेत. आणि त्यात निसर्गाचीही भर पडते आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून जलदगतीने नुकसान भरपाई मिळाली, तर त्यांना तो दिलासा ठरू शकतो,अशा प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

Goa Opinion: ‘गोंयकारांनी’ घरांसाठी सरकारी दयेवर अवलंबून राहावे का?

Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

Ravi Naik: गोव्याच्या राजकारणाला वळण देण्याची हिकमत असलेला नेता 'रवी नाईक'

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

SCROLL FOR NEXT